Saturday, December 21, 2024

/

मोदगा अपघातातील जखमीचाही मृत्यू …दोन मित्रांची एक्झिट

 belgaum

समोरून येणाऱ्या टिप्परने दुचाकी ला धडक दिलेला अपघातात दोघा मित्रांचा बळी गेल्याची घटना बेळगाव बागलकोट रोडवर पंतनगरजवळ (मोदगा) शनिवार रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे.

मूळचा कित्तुरचा सध्या सुळेभावी येथे तव्यात असलेला वास्तव्यास असलेला विठ्ठल ढवळी वय22 याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर सुळेभावी येथील सोमनाथ खवाशी वय 22 हा गंभीर जखमी झाला होता. झाल्यानंतर जखमीला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र सुरू असताना शनिवारी मध्यरात्री त्याचाही मृत्यू झाला आहे.

अपघातात मयत झालेले विठ्ठल आणि सोमनाथ हे दोघेही मित्र होते शनिवारी रात्री बेळगावहून ते आपल्या दुचाकीवरून सुळेभावी कडे निघाले होते त्यावेळी पंतनगर मोदगा येथे समोरून येणाऱ्या टिप्परने जोराची धडक दिल्याने हा अAccident deathपघात झाला त्या अपघातात विठ्ठलचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सोमनाथ हा गंभीर रित्या जखमी झाला होता त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काहीही उपयोग न झाल्याने त्याचाही मृत्यू झाला आहे.

मारिहाळ पोलिसांकात या घटनेची नोंद झाली आहे. पेपर चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे हा अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन युवकांना जीव गमवावा लागला आहे दरम्यान अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या टिप्पर चालकाला मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे.

रविवार 7 आगष्ट आज फ्रेंडशिप डे आहे आणि फ्रेंडशिप डे च्या पूर्वरात्री या दोन्ही मित्रांची अपघाताने झालेली एक्झिट ही अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे यामुळे सुळेभावी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.