शिक्षणाच्या दृष्टिकोनातून दररोज शेकडो विद्यार्थी ग्रामीण भागातून शहराकडे येत असतात. प्रामुख्याने त्यांना प्रवास करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेस वरच अवलंबून राहावे लागते.मात्र सदर बसेस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते.परिणामी यासाठी मच्छे येथील विद्यार्थ्यांनी निदर्शने करत बेळगाव खानापूर रोड चक्क दोन ते अडीच तास अडवून धरला.
नियमित बस सुरू करा किंवा लांब पल्ल्याच्या बसेस मच्छे बस स्टॉप वर थांबवा अशी मागणी करत मच्छे येथील शेकडो शुक्रवारी निदर्शने करत रस्त्यावर आले.आणि रोको रास्ता रोको करत परिवहन मंडळाचे लक्ष वेधून घेतले.
मच्छे येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शहरात येत असतात. यामुळे दररोज हजारो नागरिकांचा प्रवास शहराच्या दिशेने सुरू असतो. मात्र बसेस अभावी अनेक वेळा विद्यार्थ्यांना बस स्टॉप वरच ताटकळत थांबावे लागते. बस थांब्यावर हात करून देखील बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.परिणामी वेळेचे पालन होत नाही. आणि शैक्षणीक नुकसानाला सामोरे जावे लागते.
म्हणूनच नियमित बस सुरू करण्याबरोबरच या ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसेस थांबवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात आली. याच मागणीसाठी बेळगाव खानापूर रोड सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत रोखण्यात आला.यामुळे के एस आर टी सी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या ऐकून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी निदर्शने करत प्रवासासाठी बसेसची मागणी करत आपली समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडली.परिवहन खात्याकडून मच्छे वरून जाणाऱ्या सर्व तिन्ही थांब्याना थांबवण्यात येतील या शिवाय सोमवार पासून नवीन दोन बस सकाळी 6:30 ते 9:30 आणि सायंकाळी 4:00 ते 6:30 पर्यंत सोडण्याच आश्वासन देण्यात आले.
या आश्वासनानंतर निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी माघार घेतली. यामुळे शुक्रवारी सकाळी बेळगाव खानापूर हायवेवर चक्का जाम झाला होता.