बेळगाव शहर बिबट्याच्या दहशतीखाली असतानाच बेळगाव रिसालदार गल्ली मात्र कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहे. कारण कुत्र्यांची टोळकी या परिसरात वावरत असून यामुळे या भागातून ये जा करणे कठीण झाले आहे.
सदर कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दहा बारा कुत्र्यांची टोळकी या ठिकाणी ठाण मांडून दिवस रात्र याच ठिकाणी वावरत असून कुत्र्यांच्या हैदोसामुळे भीती निर्माण झाली आहे.
बेळगांव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदर कुत्री कचरा, खरकटे अन्न खाऊन जगत आहेत. मात्र ते मिळत नसल्याने भुकेच्या आशेने अंगावर जात आहेत ठिकठिकाणी कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे.
कुत्र्याच्या दहशतीखाली रिसालदार गल्ली येथील नागरिक आहेत. लहान मुलांना या ठिकाणी एकटे पाठवणे देखील भीतीचे असून दुचाकीवरून जाताना देखील गाडीच्या पाठीमागे धावणे तसेच अंगावर येणे असे प्रकार कुत्र्यांकडून सुरू आहेत.
ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असताना महापालिकेने प्रभावी पावले उचलणे गरजेचे बनले आहे. कुत्र्यांची शोध मोहीम तसेच कुत्र्यांना पकडणे, नसबंदी करणे गरजेचे असताना मनपा मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी कोणाच्या घटना सातत्याने समोर येत असताना महापालिकेचे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या साठी धोकादायक असून रिसालदर गल्ली येथील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.