श्रावण मास हा हिंदू धर्मातील पवित्र मास मानला जातो. या महिन्यात अनेक सण, उत्सव, धार्मिक विधी आयोजित केले जातात. प्रामुख्याने श्रावण महिन्यात शिवशंकराची उपासना महत्वाची मनाली जाते.
आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी जीवापाड कार्य करणाऱ्या कट्टर धर्मउपासकांमध्ये श्री रमाकांत कोंडुस्कर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी तसेच आपल्या धर्मातील अनेक चालीरीती जपण्यासाठी रमाकांत कोंडुसकर हे नेहमीच तत्पर आणि अग्रेसर असतात.
४ दिवसांपूर्वी श्रीराम सेने हिंदुस्थान या संघटनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री रमाकांत कोंडूस्कर यांनी समाजासाठी शक्य होईल ती मदत करण्यासाठी तयार रहा असे आवाहन केले होते . या आवाहनानुसार आज रमाकांत कोंडुस्कर यांच्या माध्यमातून दक्षिणकाशी म्हणून परिचित असलेल्या श्री कपिलेश्वर देवस्थानात श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दूध वाटप करण्याची सेवा हाती घेण्यात आली.
श्री कपिलेश्वर देवस्थानात मोठ्या संख्येने सोमवारी भाविकांची उपस्थिती असते. या भाविकांना दक्षिण विभाग संघटन प्रमुख श्री राजेंद्र बैलूर यांच्या मार्गदर्शनाखाली दूध वाटप करण्यात आले.
भरत नागरोली, सचिन निर्मले, शिवा कोंडुस्कर, अभिषेक पुजारी,विजय होनगेकर उदय पाटील यासह अनेक कार्यकर्त्यांनी या परिसरात येणाऱ्या भाविकांना दूध वाटप करण्याची सेवा केली. भर पावसात देखील भिजत राहून कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेल्या सेवेचे भाविकांनी कौतुक केले.