गावातील ग्रामदैवत आणि त्या गावातील ग्रामस्थांची त्याच्यावर असणारी श्रद्धा असे चित्र प्रत्येक गावामध्ये दिसून येते.गावातील प्रत्येक कार्यात ग्रामदैवताचा आशीर्वाद असल्याखेरीज कार्य पार पडत नाही.नुकताच श्रावण महिना उत्साहात साजरा करण्यात आला.आणि पुढील सोमवारी चक्क कलमेश्वर मंदिर कंग्राळी खुर्द येथील कलमेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारा जवळ आळंबीतून नागदेवतेचा साक्षात्कार घडला.
भक्तांनी नुकताच उत्साहाने तिसऱ्या सोमवारी परव आयोजित केला होता. त्या अंतर्गत साधारण दहा हजार हून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत जागृत देवस्थान कलमेश्वरचे दर्शन घेतले.आणि आता श्रावण संपताच या सोमवारी सदर आळंबीतून नाग देवता साकार झाली.
रविवारपासून त्या ठिकाणी आळंबी आल्याचे चित्र दिसून आले मात्र सोमवारी सदर आळंबीला नाग देवतेचा आकार प्राप्त झाला तर मंगळवारी फनी असलेली नागदेवता त्या ठिकाणी अचूक अशी दर्शनास पडली.
यामुळे ग्रामदेवतेचा साक्षात्कार भक्तांसाठी आनंदाचा ठरला आहे.सदर नागदेवतेचे त्या ठिकाणी पूजन करत आरती करण्यात आली. ही बाब गावात समजतात नागरिकांनी आळंदीतून साकार झालेली नागदेवता आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावल्याचे दिसून आल.
गावातील कलमेश्वर मंदिर हे भक्तांच्या निधीतून उभे करण्यात आले आहे शिवाय ग्रामस्थांनी प्रत्यक्ष स्वकष्टातून सदर मंदिर साकारले आहे. कलमेश्वर मंडळ कंग्राळी खुर्द यांच्या पुढाकारातून देखील मंदिराचा विकास करून मंदिर पूर्ण झाले. यामुळे नागदेवतेचा अशाप्रकारे घडलेला साक्षात्कार भक्तांसाठी आनंदाचा आणि श्रद्धेचा विषय ठरला आहे. जणू साक्षात नागदेवतेने भक्तानां दर्शन दिले असल्याचे मत व्यक्त होत आहे.