बिबट्या रेस कोर्स मैदानात तळ ठोकून 25 दिवस झाले.मात्र अजूनही बिबट्या वनविभागाच्या हाती आलेला नाही. यामुळे सोमवारी देखील बिबट्याची शोध मोहीम सुरूच होती. दररोज अडीशे ते तीनशे कर्मचारी बिबट्याच्या शोध मोहिमेत आहेत.
मात्र रविवारपासून केवळ 80 वनविभागाच्या कर्मचाऱ्यांत समवेत शोध मोहीम राबविण्यात येत होती.असेच चित्र सोमवारी देखील दिसून आले.रेस कोर्स मैदानाच्या चारही बाजूने कडक पोलीस बंदोबस्तात शोधमोहीम सुरू असली तरीही अंतर्गत भागात मात्र केवळ इतर दिवसांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याचे दिसून आले.
बिबट्याच्या शोधात रेस कोर्स मैदानाचा सारा परिसर पिंजून काढण्यात आलेला आहे. मात्र वनखाते त्याला पकडण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे.एका बाजूला बिबट्याची शोध मोहीम राबविण्यात येत आहे मात्र दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या मनात भीती आणि सदर 22 शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे दररोज नवनवीन उपायोजना राबवत बिबट्याचा शोध चालू असताना देखील बिबट्या हाती सापडलेला नसल्याने 25 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर आता वनविभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे अनेक कर्मचारी रजेवर गेले असल्याने दररोज अडीशे ते तीनशे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असणारी बिबट्याची शोध मोहीम आता बारगळली आहे.
रेस कोर्स जंगलचा भाग साधारण पंधरा ते अठरा किलोमीटरचा असून इतक्या संख्येने दररोज कर्मचारी बिबट्याला शोधत असताना देखील बिबट्या सातत्याने चकवा देत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अजूनही बिबट्या सापडलेला नाही मात्र बिबट्याच्या सापडण्याची प्रतीक्षा न करता कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेत रेस कोर्स मैदान सोडले आहे.
यामुळे अंतर्गत भागात साधारण 80 कर्मचारी कार्यरत असून मैदानाच्या चोहोबाजूने मात्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिणामी सोमवारी कोणतेही विशेष सर्चिंग ऑपरेशन रेस कोर्स मैदानात राबविण्यात आले नाही.मात्र तळ ठोकून बसलेला बिबट्या निदर्शनास येतो का हे पाहत प्रत्येक वनविभाग कर्मचारी आपली ड्युटी बजावत होते.