आपल्या बहिणीची रक्षा करणे हा मुळ उद्देश असतो रक्षाबंधनचा. यामुळे आपल्या बहिणीबरोबर आपल्या मुलांची काळजी घेणारे रिक्षावाले मामा हे तर शैक्ष शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचे भाऊ. आणि म्हणूनच शाळेला आणण्यापासून घरी नेण्या पर्यंतच्या प्रवासातील या आपल्या भावांना शिक्षक बहिणींनी राखी बांधली.
एस पी एच भरतेश कन्नड माध्यम शाळेत हे आग9ळे वेगळे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आपल्या शाळेची वर्दी करणाऱ्या तब्बल 45 रिक्षमामाना शाळेच्या 30 शिक्षकांनी राख्या बांधल्या. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यानी स्वतः बनवलेल्या राख्या बांधून 500 विद्यार्थ्याच्या समवेत राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
दररोज शाळेतून विद्यार्थ्यांना घरी नेणे आणि घरातून पुन्हा शाळेत आणणे या कार्यात रिक्षावाल्या मामांची भूमिका महत्त्वाची असते केवळ विद्यार्थ्यांना नेणे आणणे इथपर्यंत नव्हे तर त्यांची व्यवस्थित काळजी घेणे यामध्ये रिक्षावाल्या मामांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणूनच यावर्षी शाळेची वर्दी करणाऱ्या रिक्षावाल्या मामांना राखी बांधून शिक्षकांनी त्यांच्या प्रति बंधुभाव व्यक्त केला.
विशेषता विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या त्यांना बांधण्यात आल्या. यामुळे मामा भाचे असे नाते असणारे रिक्षावाले मामा देखील खुश झाले यामुळे रिक्षावाल्या मामांना देखील मोठा आनंद झाला.
या बरोबर प्रत्येक वर्गातील मुलींनी मुलांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.भरतेश स्कूल इ.एलकेजी ते दहावीपर्यंत असून एकूण 500 विद्यार्थ्यांच्या समवेत हा रक्षाबंधनाचा आगळा सोहळा पार पडला.