शाळेतील फलक लेखन विद्यार्थ्यांच्या अक्षरलेखनावर खूप मोठा परिणाम करते. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी प्रामुख्याने शिक्षकांचे हस्ताक्षर हेच महत्त्वाचे ठरते. अक्षरांची वळणे आणि लिखाणाची सुंदरता अक्षर कसे आहे हे ठरवते.
शाळेतील एखाद्या कार्यक्रमातील फलक लेखन हा कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग ठरतो. आणि हाच लेखनाचा नमुना चक्क विद्यार्थी कृती पुस्तकात देण्यात आला आहे. हो येळ्ळूर येथील येळ्ळूरवाडी शाळेमध्ये सुंदर रित्या लिहिल्या गेलेल्या फलक लेखनाचा नमुना पाठ्यपुस्तकात नमूद करण्यात आला आहे.यामुळे बेळगाव मधील येळ्ळूर हे गाव आता पाठ्यपुस्तकात दाखल झाले आहे. ही अभिमानास्पद बाब आहे.
येळ्ळूर येथील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडीमधे येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील आणि शाळेच्या निवृत्त शिक्षिका अनुपमा रेवणकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
ही बातमी आणि या संबंधित फोटो त्यावेळी सोशल मीडयाद्वारे व्हायरल झाले होते. त्यावेळी अतिशय सुंदर रित्या लिहिल्या गेलेल्या फलक लिखाणाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.
यामुळे कर्नाटक सरकार सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने या फलक लिखाणाचा नमुना अध्ययन पुनर्प्राप्ती ( कलिका चेतरीके ) 2022 – 23 या इयत्ता सहावीच्या प्रथम भाषा मराठी विद्यार्थी कृती पुस्तकात दिला गेला आहे. ही येळ्ळूर वासियांसाठी अभिमानास्पद बाब असुन सर्वत्र याची चर्चा होत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर तो कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे याबाबतची सर्व माहिती फलकावर नमूद केली जाते यामुळे कार्यक्रमांमधील सत्कारमूर्ती तसेच कार्यक्रमाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य फलकाद्वारे नमूद केली जातात इयत्ता सहावीच्या कृती पुस्तकात सदर फलक लेखन देण्यात आले असून त्या फलकाच्या आधारे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना फलक लेखनाचा नमुना कसा असावा हे समजून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.