श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज असतो ग्रामीण भागात प्रामुख्याने श्रावण महिना खूप कडक पाळला जातो.नुकताच शनिवारी श्रावण महिना संपला असून आता वेध लागले आहे ते उंदरीचे.गणेशोत्सव मध्ये गणेश चतुर्थी झाली आणि बाप्पा घरोघरी विराजमान झाले की दुसऱ्या दिवशी उंदरी केली जाते. म्हणूनच शनिवारी श्रावण संपताच उंदरीच्या पार्श्वभूमीवर रविवारी खानापूर तालुक्यातील बकरी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
बाप्पाचे घरोघरी आगमन झाल्या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी उंदरी केली जाते. म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य करून तो उंदरीला दाखवला जातो.आणि शेतामध्ये सदर नैवेद्य पसरवून मांसाहारावर ताव मारला जातो. संपूर्ण श्रावण महिना कडक पाळल्यानंतर लगेचच गणेशोत्सव येतो.
त्यामुळे या काळात मांसाहार न करता बाप्पा विराजमान झाल्यानंतर उंदरीलाच मांसाहार केला जातो.यामुळे उंदरीच्या निमित्ताने बकरी बोकड खरेदी करून ही प्रथा पाळली जाते. शिवाय एक बकरी खरेदी करून त्याचे वाटे करून उंदरीचा नैवेद्य करतात.यामुळे उंदरीच्या निमित्ताने खानापूरच्या बकरी बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले.
उंदीर बीज करण्याची प्रथा बेळगाव सह इतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करण्यात येते. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांना मदत करणारे इतर प्राणी यांचे ऋण म्हणून उंदराला देखील मांसाराचा नैवेद्य दाखविला जातो.या निमित्ताने प्रत्येक शेतकरी उंदरीची पूजा करून मांसाराचा मांसाहाराचा नैवेद्य संपूर्ण शेतभर टाकतो. प्रामुख्याने खानापुरात अजूनही पूर्वीपासूनची सुरू झालेली प्रथा पाळली जाते.
म्हणूनच खानापूरच्या बकरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात लाखोंची उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले.
साधारण 6 हजार ते 30 हजार रुपये पर्यंतचे बकरी त्या ठिकाणी विक्रीसाठी आली होती. गर्लगुंजी,नीडगल, जांबोटी नंदगड, देशवड ,कणकुंबी या भागातील नागरिक शेतकरी बोकड खरेदीसाठी बाजारात दाखल होते. हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या नागरिकांकडून या बाजारात मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची खरेदी करण्यात आली.यामुळे गुरुवारी होणाऱ्या उंदरीसाठी ग्रामीण भागात जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून आले.