बिबट्या सोमवारी सर्वांच्या हातावर तुरी देत पसार झाला.परिणामी बिबट्याची दहशत अधिकच वाढली.यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी असलेल्या नियोजनाचा अभाव याला जबाबदार असल्याचे दिसून आले. म्हणूनच उशिरा का होईना प्रशासन जागे झाले असून गोल्फ कोर्स परिसराच्या चारही बाजूने वनविभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी 24 तास बंदोबस्तात खडा पहारा देत आहेत.
बिबट्याला जेरबंद करण्याबरोबरच बिबटया आपली जागा बदलू नये यासाठी गोल्फ कोर्स परिसराला चारही बाजूने पहारा आहे.यामुळे सदर परिसराला छावणी चे स्वरूप प्राप्त झाले आहे.सोमवारी बिबट्याने चकवा दिल्यानंतर वनविभाग अधिकच सज्ज झाला असून बिबट्याची शोध मोहीम अधिक प्रभावी राबविण्यासाठीच गोल्फ कोर्स परिसराच्या चारही बाजूने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बिबट्याची दहशत निर्माण झाली असतानाच सोमवारी हातात येणारा बिबट्या निसटून गेल्याने चिंता अधिकच वाढली असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
बिबट्या सातत्याने दर्शन देत असून मागील पंधरा दिवसापासून सुरू असणारे प्रयत्न अपयशी ठरत आहेत यामुळेच प्रभावी पाऊल म्हणून 24 तास या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मागील चार दिवसापासून बिबट्यासाठी वनविभाग आणि पोलीस विभाग यांचे कोंबिंग ऑपरेशन देखील पडले मात्र तरीदेखील बिबट्या हाती आला नसल्याने अडीचशे एकर भागात विखुरलेल्या गोल्फ कोर्स परिसरातून बिबट्या निसटू नये किंवा त्याने केलेली जागा बदलू नये यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बिबट्या या ठिकाणी टेन्ट करून असल्याने आता बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली.
असा असू शकतो बिबट्या
बिबट्या शहरीकरणाशी जुळवून घेणारा आहे त्याला माणसांची वाहनांची ये जा हॉर्न आवाज आदींच्या सहवासाचा अनुभव आहे तो गेल्या कित्येक महिन्यापासून गोल्फ कोर्स जंगलात घर करून बसला असावा यावर बहुतेक शिक्कामोर्तब झाले आहे त्यामुळे या चतुर बिबट्याला जाळ्यात अडकवण्यासाठी वन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.