स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र युवकांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवत स्वातंत्र्यदिनी नागरिकांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
रस्ते आणि रस्त्यातील खड्डे ही बेळगावकरांसाठी रोजची डोकेदुखी आहे.यामुळेच आपल्या गल्ली आणि परिसरात असणारे खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती घेत लक्ष्मी गल्ली शहापूर येथील युवकांच्या श्रमदानातून खड्डे बुजविण्यात आले.
समाजसेवक शुभम नादिवडेकर यांनी पुढाकार घेऊन युवकांना सोबत घेऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्याचे काम पार पाडले. 75 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जात असताना गल्लीतील सोयी सुविधा अचूक असाव्यात या उद्देशानेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून नागरिकांची सोय करून दिली.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यामध्ये पाणी साचून नागरिकांची मोठी गैरसोय होत होती छोटे-मोठे अपघात देखील घडत होते यामुळे शुभम नांदीवडेकर यांनी राबवलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण असून खड्डे बुजवलेल्या मुळे समाधान व्यक्त होत आहे.
या युवकाचीही खड्डे बुजवा मोहीम
वार्ड क्रमांक 25. सदाशिव नगर शेवटच्या क्रॉस येथे
समाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी मध्ये खड्डे बुझवण्याचे कार्य केले. मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे ये – जा करण्याऱ्यांना त्याचा त्रास होत आहे अश्या वेळी त्या प्रसाद चौगुले यांनी स्वतहून श्रमदानातून खड्डे बुजवले आहेत.
प्रसाद चौगुले यांनी बुजवले खड्डे-सदाशिवनगर चौथ्या क्रॉस मधील खड्डे श्रमदानातून बुझवले-स्वातंत्र्यदिनी उपक्रम pic.twitter.com/M2nPi2jDlH
— Belgaumlive (@belgaumlive) August 15, 2022