बेळगाव विमानतळाचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे परिणामी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि आता या विमानतळावर (वाहन पार्किंग)पार्क आणि फ्लाय सुविधाही उपलब्ध झाली आहे.
प्रवासी आता त्यांची वाहने विमानतळावर पार्क करू शकतात आणि उड्डाण करू शकतात, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ होतो. पार्किंगची निविदा PCT मल्टि-सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आली आहे आणि ते 5+2 वर्षांच्या कालावधीसाठी बेळगाव विमानतळावरील पार्किंग सुविधेचे व्यवस्थापन करणार आहेत.
सांबरा विमान तळावर पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यासच हे शुल्क लागू होईल. विमानतळावर ड्रॉप किंवा पिकअपसाठी जाणार्या कोणालाही पार्किंग शुल्क भरावे लागणार नाही परंतु इतर विमानतळांप्रमाणे वेळ साधारणपणे 4 मिनिटांपेक्षा कमी असतो येथे स्पष्टपणे त्याबद्दल काहीही लिहिलेले नाही, परंतु आम्ही असे गृहीत धरू शकतो की पार्किंगचे समान नियम समान असतील.
त्यामुळे पिकअप किंवा ड्रॉपसाठी 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहू शकत नाही (गृहीत धरून) नाहीतर इतर शहरांप्रमाणे फी किंवा दंड भरावा लागेल. साधारणपणे 4 मिनिटांच्या पुढे दंड वसूल केला जातो .
त्यामुळे जर एखाद्याने 24 तास कार पार्क केली तर त्याला सुमारे 255 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागतील.
असा आहे पार्किंग दर:
वाहनाचा प्रकार | 00 ते 30 मिनिटे | 30 ते 120 मिनिटे |
दुचाकी | Rs.10/- | Rs.15/ |
कार | Rs.20/- | Rs.35/- |
बस,ट्रक आणि कोच | Rs.20/- | Rs.50/- |
टेम्पो,मिनी बस | Rs.20/- | Rs.35/- |
पार्किंग सुविधा एका दिवसासाठी प्रवास करणाऱ्या अल्पमुदतीच्या प्रवाशांसाठी हे खूप उत्साहवर्धक ठरू शकते, कारण त्यांना टॅक्सी घेण्यासाठी किंवा बेळगाव विमानतळावरून येण्यासाठी कोणीतरी कॉल करण्याचा त्रास सहन करावा लागतो. या सुविधेमुळे, फ्लायर्सची (विमान उड्डाण करणाऱ्यांची)संख्या देखील वाढू शकते