*सणाच्या हंगामात व्यापाऱ्यांनो सावधान*सैन्य अधिकारीअसल्याचे भासवून महिला उद्यमीला सत्तर हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.
बेळगाव मधील एका होतकरू महिला उद्यमीला 70 हजार रुपयाला फसवण्यात आले आहे सदर महिला एक लहान लॅब चालवत असून तिला मंगळवारी एक कॉल आला. कॉल करण्याऱ्या व्यक्तीने आपण बेळगाव येथील सैन्य अधिकारी आहे आर्मीच्या 100 जवानांची रक्त तपासणी करायची आहे असे सांगितले. त्या व्यक्तीचा व्हाट्सएपवर आर्मी वेशातील DP व त्याने पाठविलेल्या आर्मी परिसरात फोटो पाहून महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला.
या तोतया व्यक्तीने आपण महिलेला 50 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करत आहे असे भासवून तिच्या बँक खात्यातून 70 हजार रुपये लंपास केले. आपण फसविले गेलो आहे हे लक्षात येताच महिला बेळगावच्या सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदलविली असून सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदर महिला उद्यमीने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते व ऐन सणामध्ये अशी आर्थिक फसवणुक झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव शहरात आर्मीची वस्ती आहे. आर्मीच्या नांवावर विश्वास संपादन करून व अपल्या बोलण्यात फसवून ऑनलाईन फसवणूचे प्रकार बेळगाव शहर व ग्रामीण भागात नेहमीच होत आहेत.
सामान्य माणसांचे अज्ञान हेच या प्रकारच्या फसवणुकीला कारणीभूत ठरते आहे. विशेषतः व्यापारी वर्गाला येथे लक्ष करण्यात येते आहे. तरी सणासुदीच्या घाई गडबडीत व्यापारी वर्गाने सतर्क राहणे गरजेचे आहे. ही माहिती घरातील महिलांना व आपल्या मित्रपरिवारा पर्यंत पोहचवणे ही प्रत्येक व्यक्तीची सामाजिक जबाबदारी आहे. समाजाला ऑनलाईन फसवणूक या प्रकाराबद्दल सज्ञान करूनच या घटनांना आळा बसू शकतो. ही बातमी share करून ऑनलाईन फसवणूकी विरुद्ध या लढाईत सहभागी व्हा.
-रवी बेळगुंदकर
शिवाजी नगर, बेळगाव