बेळगाव लाईव्ह विशेष : खेळ हा कित्येकांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण आणि अविभाज्य घटक असतो. कित्येकजण कोणत्या ना कोणत्या खेळप्रकाराला पसंती दर्शवितो. यातील काही खेळाडूं केवळ छंद म्हणून खेळ खेळतात, काही व्यायाम आणि सुदृढ शरीरासाठी खेळतात तर काही लोक करियरच्या दृष्टिकोनातून खेळ पुढे नेतात.
भारताला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा आहे. यात हॉकीमधील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचे नाव लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी ठरत आले आहे. हॉकीचे जादूगार मानले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजेच २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
आज भारतातील अनेक खेळाडू हे तालुका, जिल्हा, राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली कामगीरी दाखवत आहेत. क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेल्या आपल्या देशातील अनेक खेळाडूंसाठी आजचा दिवस हा महत्वपूर्ण असून आपल्या देशाचे नाव उत्तुंग शिखरावर पोहोचून सर्वदूर कीर्तीचा डंका पसरविणाऱ्या खेळाडूंना ‘टीम बेळगाव लाईव्ह’ कडून हार्दिक शुभेच्छा!
आज राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून बेळगावच्या क्रीडा विभागासाठी योगदान दिलेल्या बेळगावमधील क्रीडापटूंची विशेष मुलाखत आज आम्ही प्रकाशित करत आहोत. बेळगावमध्येही अनेकविध खेळ प्रकारात स्वतःसह जिल्ह्याचे नाव उंचावणारे हे क्रीडापटू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेत आहोत.
बेळगावमधील ऍथलेट्स तुषार भेकने, जलतरणपटू स्वरूप धनुचे, कुस्तीपटू राधिका बस्तवाडकर, ऍथलेट्स जाफरखान सरावर, कराटेपटू वैभवी मोरजकर आणि बॅडमिंटनपटू सान्वी मांडेकर या क्रीडापटूंना आज बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त सर्व क्रीडापटूंना बेळगाव लाइव्हच्या खूप साऱ्या शुभेच्छा !