भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा च्या माध्यमातून तिरंगा ध्वज विक्री करण्यात येत आहे प्रशासनाच्या माध्यमातून विविध सरकारी कार्यालयात तिरंगा ध्वजाची विक्री केली जात आहे.प्रामुख्याने पोस्ट ऑफिस मध्ये देखील या तिरंगा ध्वजाची विक्री करण्यात येत आहे. मात्र तिरंगा ध्वजाची विक्री करत असताना तो ध्वज व्यवस्थित आहे का याची चाचणी न करताच देण्यात येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्य पोस्ट कार्यालयात तिरंगा ध्वज विक्री करण्यात येत असताना जिल्हा पंचायत माजी सदस्य नागेश देसाई यांनी तिरंगा ध्वज आडवे तिडवे, तिरके तसेच व्यवस्थित शिलाई न मारलेले असल्यामुळे नाराजी व्यक्त करत याबाबतचा जाब संबंधित पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारला.
अधिकाऱ्यांनी सदर ध्वज सरकारकडून आले असून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे सांगितले. सदर बाप अपमानिस्त असून तात्काळ तिरंगा ध्वजाची विक्री थांबवावी अशी मागणी केली. या प्रकारामुळे ध्वज विक्री करण्याबाबतची सक्ती असल्यामुळे त्यांचे विक्री केली जात असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.
देशाचा अभिमान म्हणून मोठ्या उत्साहात आणि आनंदात तिरंगा ध्वज खरेदीसाठी नागरिक त्या ठिकाणी येत आहेत.मात्र अशा प्रकारे व्यवस्थित स्थितीत नसलेले ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत असून देशाचा अभिमान असणारा तिरंगा ध्वजाचा अवमान होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.सदर ध्वज विक्रीसाठी ठेवण्यापूर्वी त्याची चाचपणी करणे आवश्यक आहे. मात्र नागरिक ध्वज घेण्यासाठी आले असताना त्यांच्यासमोर अशाप्रकारे व्यवस्थित नसलेले ध्वज हाती येत असल्याने नेमके प्रशासनाने विक्रीसाठी सक्ती केल्याने त्यांची विक्री केली जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर दिसावा या उद्देशाने सरकारी कार्यालयात त्यांची विक्री करण्यात येत आहे. नागरिकांना कमी दरात तसेच व्यवस्थित रित्या ध्वज मिळावा या उद्देशाने तसेच तिरंग्याचा अवमान होऊ नये म्हणूनच प्रशासनातर्फे सदर व्यवस्था करण्यात आली आहे .मात्र अशा प्रकारे सरकारी कार्यालयातच ध्वजाची चाचपणी व्यवस्थित होत नसेल तर मात्र हर घर तिरंगा या संकल्पनेचा हेतू दुर्लक्षित होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.