स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा च्या माध्यमातून घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे मात्र अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आता तिरंगा ध्वज उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी कोणता झेंडा घेऊ हाती असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तिरंगा ध्वज प्रत्येकाला उपलब्ध व्हावा यासाठी शासकीय कार्यालयात ध्वजवितरणाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र पोस्ट ऑफिस तसेच डीसी ऑफिस व इतर शासकीय कार्यालयातील ध्वज संपले असल्याने नागरिकांची निराशा झाली आहे.
हर घर तिरंगा च्या माध्यमातून 13ऑगस्ट ते दि 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येकाच्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील करण्यात आली आहे. तसेच सोयीच्या दृष्टीने शासकीय कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेले कापडी ध्वज खरेदी करण्यासाठी नागरिक उपस्थिती दर्शवत आहेत. मात्र आता तिरंगा ध्वज उपलब्ध नसल्यामुळे काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पुन्हा सदर ध्वज उपलब्ध होण्याबाबत देखील शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येकांमध्ये उत्साह आहे.शिवाय प्रत्येकाच्या घरावर दिमाखात तिरंगा ध्वज फडकणार असल्याने कापडी ध्वज खरेदीला नागरिक उत्सुकता दर्शवत आहेत. मात्र सर्व सरकारी कार्यालयात ध्वज संपले असून नागरिकांची निराशा झाली आहे.
शाळा स्तरावर तसेच विविध संस्था संघटना म्हणून प्रशासनामार्फत हर घर तिरंगा याची जोरदार जनजागृती करण्यात आली होती.मात्र हरघर तिरंगा हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासनाने तिरंगा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
प्रत्येकाला ध्वज उपलब्ध व्हावा यासाठी 22 रुपये दराने शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा ध्वज विक्री केला जात होता परिणामी सदर खरेदी करण्यासाठी नागरिक हजेरी लावत होते आता मात्र आता ध्वज उपलब्ध नसल्याने काय करावे आणि उद्यापर्यंत ध्वज उपलब्ध होतील का असा सवाल देशप्रेमी नागरिकांमधून विचारला जात आहे.