बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गदगहून वन खात्याचा पथक बेळगावात दाखल होत आहे.शुक्रवारी सकाळी जाधव नगर परिसरामध्ये बिबट्याने एका गवंडी कामगारावर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर बेळगावच्या वनखात्या आणि पोलिसांनी बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे
सदर बिबट्याने सिद्राय निलजकर वय 38 रा. खनगाव या गवंड्यावर किरकोळ हल्ला केल्यानंतर कंपाउंड ची भिंत ओलडून हनुमान नगर परिसरातल्या खुल्या जागे मधल्या झुडुपात गेलाय.
बेळगावचे वन खात्याचे अधिकारी यासह पोलीस विभाग आणि एसबीआरएफचची टीम दुपारी पासूनच हनुमान नगर परिसरात दाखल झाली असून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कायदा आणि सुव्यवस्था चे विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी आणि वरिष्ठ वन अधिकारी यांनीही जाधव नगर परिसराला भेट देत शोध मोहिमेवर नजर ठेवून आहेत.कामगारावर हल्ला करून जाधव नगर परिसरात लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी फॉरेस्ट खात्याकडून गदगहुन विशेष पथक मागवण्यात आले असून ते लवकरच दाखल होत आहे.
सुरुवातीला बिबट्या की रान मांजर आहे याबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता मात्र सीसीटीव्ही मध्ये बिबट्याचा चित्र स्पष्ट झाल्याने आता बिबट्याची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.वन खात्याने साफळा आणून ठेवला आहे.
ड्रोन कॅमेरा द्वारे लपून बसलेल्या बिबट्याचा शोध करून त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला कामगारावर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले