गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या टेन्ट करून दोन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी देखील बिबट्या अजूनही वन खात्याला सापडलेला नाही. यामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले असून पुन्हा बिबट्याची चाहूल लागली आहे. कारण बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान हिंडलगा ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.यामुळे बिबट्या या ठिकाणीच असून बिबट्याची हुलकावणी नागरिकांसाठी भीतीची ठरत आहे.
हनुमान नगर परिसरात बिबट्या मागील दोन दिवसापूर्वी वनखात्याला दिसून आला होता. यामुळे गोल्फ कोर्स परिसरातच बिबट्या ठाण मांडून असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे बिबट्याची शोध मोहीम करण्याची मागणी केली जात होती. मात्र आता पुन्हा एकदा ग्रामस्थांना बिबटया दिसल्याने भिती अधिकच वाढली आहे. वारंवार बिबट्या नागरिकांना दर्शन देत असून बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे बनले आहे.
बुधवारी रात्री बाराच्या दरम्यान हिंडलगा येथील अजय मास्ते यांना बिबट्या उडी मारून गोल्फ कोर्स परिसरात गेल्याचे दिसून आले. ते आपल्या कारमधून महात्मा गांधी स्मारकाकडून प्रवास करत होते. यावेळी बिबट्या उडी मारून रस्त्यावर आला आणि गोल्फ कोर्स परिसरात निघून गेला असल्याचे त्यांनी सांगितले.बिबट्याला पाहताच त्यांनी तात्काळ हिंडलगा गणपती जवळील पोलीस ठाण्यात जाऊन बिबट्याला पाहिल्याची माहिती दिली.यामुळे पुन्हा एकदा बिबट्याची चाहूल लागली असून बिबट्याला लवकरात लवकर बिबट्याला पकडण्याचे आवाहन वनखात्यासमोर निर्माण झाले आहे.
बिबटया गोल्फ कोर्स परिसरात येऊन साधारण दोन आठवड्यांचा कालावधी उलटला असून या परिसरात घर करून राहिलेल्या बिबट्या आता सातत्याने नागरिकांना दर्शन देत आहे. यामुळे नागरिकांना चांगलीच धडकी भरली असून वन खात्याने सर्व परिसर पिंजून काढला तरी अजूनही बिबट्याला पकडण्यात यश आलेले. नाही त्यामुळे बिबट्याची बिबट्याची लागलेली चाहूल ही नागरिकांसाठी धोक्याची असून याबाबत वनविभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे.
काल रात्री बिबट्या महात्मा गांधी स्मारकाजवळ निदर्शनास आल्याचे अजय मास्ते यांनी सांगितले असून, सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून बिबट्याची छबी या ठिकाणी कैद झाली आहे का हे तपासून पहावे अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे. यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी मदत होईल असे मत व्यक्त होत आहे.