बिबट्याचा वावर हा गोल्फ कोर्स मैदानातच असण्याची शक्यता आहे कारण पुन्हा एकदा बुधवारी गोल्फ कोर्स मध्ये दिसला असल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शीनी केला आहे त्यामुळे या भागांत पुन्हा बंदोबस्त वाढला आहे बिबट्याचा टेंट गोल्फ जंगलातचं आहे अश्या चर्चा सुरू झाल्या आहेत
गेल्या 11दिवसापासून गोल्फ कोर्स जंगलात वावर असणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्यात वन खात्याला अपयश आले आहे. 5 आगष्ट रोजी जाधवनगर परिसरात एका कामगारांवर हल्ला करून गोल्फ कोर्स जंगलात गेलेला बिबट्या वन खात्याने बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांत अडकला होता मात्र 50 कर्मचारी, विविध खात्यांचे कोंबिग ऑपरेशन,7 पिंजरे,ड्रोन कॅमेरे,22ट्रॅप कॅमेरे आदींचा वापर करून देखील बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात वन खात्याला अपयश आले होते.
काल पासूनच गोल्फ कोर्स जंगल परिसरातील एक की. मी. परिघातील सुट्टी दिलेल्या शाळांना सुरुवात झाली आहे असे असताना बुधवारी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे केवळ विध्यार्थी नव्हे तर पालक,शिक्षक आणि नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे
गोल्फ क्लब जंगल 250 एकर हुन अधिक भागांत पसरले आहे जंगल परिसरात एपीएमसी आणि कॅम्प पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून वन खाते देखील बिबट्याचा शोध घेत आहेत.
पुन्हा एकदा मिशन बिबट्या शोध मोहीम तीव्र करण्याची गरज असून याचा सोक्ष मोक्ष करण्याची गरज आहे.नुकताच पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुधोळ हाऊंड या प्रजातीची कुत्री बिबट्याच्या शोधासाठी वापरू असे वक्तव्य केले होते एकूणच वन्य जीवींचा नागरी लोकवस्ती कडे वाढणारा वावर रोखायला हवा अशीही मागणी आहे.