बेळगाव परिसरात दाखल झालेल्या बिबट्याला पकडण्यात स्थानिक वनखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आता बिबट्या मोकाट फिरू लागला असून त्याच्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.
सोमवारी पहाटे बिबट्याचा उपलब्ध झालेला व्हिडिओ पाहता क्लब रोड वरील वनिता विद्यालय ही शाळा ज्योती महाविद्यालय आणि कॅम्प भागातील सेंट झेवियर्स मराठी विध्यानिकेत या या तीनही शिक्षण संस्था सध्या अलर्ट वर आहेत. तसेच या परिसरातील इतर शाळांनाही अलर्ट देण्यात आला असून पोलीस बंदोबस्तात विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या वाहनांपर्यंत पोहोचवण्याची सूचना पत्रकारांनाच करावी लागली आहे.
सोमवारी पहाटे अटलास गिअर्स कंपनीच्या वाहनातून आपली ड्युटी संपवून परत येणाऱ्या कामगारांना बिबट्याचे दर्शन घडले. यापैकी काही कामगारांनी बिबट्याचा व्हिडिओ काढला असून रेस कोर्स परिसरातील प्रमुख रस्त्यावर अर्थात क्लब रोडला लागून असलेल्या रेस कोर्स मार्गावर बिबट्या मोकाट फिरत असल्याचे दिसून आले आहे.
दोन ऑगस्ट रोजी जाधव नगर येथे गवंडी कामगारावर हल्ला करून या बिबट्याने किरकोळ जखमी केले होते. त्यानंतर गेल्या वीस दिवसांपासून रेस कोर्सच्या जंगलामध्ये हा बिबट्या ठाण मांडून आहे. वेगवेगळ्या हास्यास्पद प्रकारे त्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न वनविभागाने केला .मात्र त्यात त्यांना यश आलेले नसून आता याचा फटका बेळगाव शहरवासीयांना आणि प्रामुख्याने लहानग्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पातळीवरील वनविभागाच्या तसेच शिकारीचा अनुभव असणाऱ्या तज्ञ टीम ना पाचारण करून या बिबट्याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दररोज बिबट्याच्या शोधाचे प्रयत्न केले जातात मात्र ते अपयशी ठरतात. बिबट्या आजवर कुत्री मांजरे यांचा जीव घेऊ लागला असून यापुढे एखाद्या विद्यार्थ्यावर किंवा परिसरात फिरणाऱ्या नागरिकांवर जर या बिबट्याने हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन आणि सरकारने वेळीच उपायोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर नागरिकांमध्ये धडकी भरलेली असून आपापल्या मुलांना शाळेला पाठवल्यानंतर आता त्यांचे काय होणार? असा गंभीर प्रश्न पालकांसमोर उभा आहे. या संदर्भात वेळीच कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर बिबट्या बिजगरणी परिसरात गेला किंवा इतर अनेक गावांमध्ये दिसला अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर वनविभाग शांत झाला मात्र हा बिबट्या रेसकोर्स परिसरातच ठाण मांडून असल्याचे आता स्पष्ट झाले असून त्याचा बंदोबस्त करण्याची सर्वात मोठी गरज निर्माण झाली आहे.
बिबट्या कॅमेऱ्यात कैद-
गेल्या पंधरा दिवसापासून गोल्फ कोर्स जंगलात वावरत असलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.एका मिनी बस चालकाला सोमवारी सकाळी 6 च्या दरम्यान कॅम्प म. गांधी सर्कल जवळ म्हणजे गोल्फ कोर्सच्या तिसऱ्या आणि चौथ्या गेटच्या आसपास pic.twitter.com/JsRwvwx6jV— Belgaumlive (@belgaumlive) August 22, 2022