बेळगाव: गोल्फ कोर्स मैदान परिसरात सोमवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने गोल्फ कोर्स मैदान परिसरातील 22 शाळांना आज पुन्हा सुट्टी देण्यात आली आहे.
गोल्फ कोर्स मैदान परिसरात पुन्हा बिबट्या आढळून आला असून सोमवारी सकाळी या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याची दखल घेत बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज मलतवाड यांनी या भागातील 22 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्या शोध मोहिमेत वनविभागाला अद्याप यश मिळाले नसून खबरदारी साठी या भागातील शाळांना सलग सात ते आठ दिवस सुट्टी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता त्या बावीस शाळांनी शनिवार-रविवार आणि इतर वेळी अधिक वर्ग घेऊन झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर धास्ती निर्माण झाली असून पुन्हा विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
अपयशी वनविभागाला बिबट्याच्या वाकुल्या…..! – https://t.co/9CK59l4U6c pic.twitter.com/tF0QBEmhh5
— Belgaumlive (@belgaumlive) August 22, 2022
*अपयशी वनविभागाला बिबट्याच्या वाकुल्या…..!*