Tuesday, June 25, 2024

/

गोल्फ कोर्स जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यांत अडकला बिबट्या

 belgaum

गेल्या तीन दिवसापासून वन खात्याने चालवलेल्या बिबट्याच्या मोहिमेला काही अंशी यश मिळाले असून वन खात्याने गोल्फ कोर्स मैदान जंगलात बसवलेल्या 16 ट्रॅप कॅमेरा पैकी एका कॅमेऱ्याने बिबट्याचे चित्र कैद केले आहे ते चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

बेळगाव वन खात्याच्या ट्रॅप कॅमेरा गोल्ड कोर्स मैदानात टिपलेला फोटो नुसार हा बिबट्या सुदृढ आहे. त्याचा फोटो आम्ही बेळगाव लाईव्ह वर बातमी सोबत अपलोड केलेला आहे. ‘बेळगावी सुद्दी’ या कन्नड वेबसाईटने सर्वप्रथम बिबट्याचा ट्रॅप कॅमेरा मधील फोटो प्रसिद्ध केला होता .

बेळगाव शहरातल्या जाधव नगर या नागरी वस्तीत शिरून गवंडी कामगाराला जखमी केलेला आणि त्यानंतर गोल्फ कोर्स मैदान जंगल परिसरात वावरत असलेला बिबट्या अखेर वन खात्याच्या ट्रॅप कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. आता कॅमेरात काही झाल्यामुळे वन विभागाने बिबट्याला सापळ्यात अडकवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.Leapord

 belgaum

बिबट्याचा शोध लावण्यासाठी शुक्रवारी दुपारीपासून वन खाते पोलीस विभाग एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाच्या वतीने जाधव नगर हनुमान नगर आणि रेस कोर्स परिसरात मोठ्या प्रमाणात संयुक्त असे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत होते. शनिवारी रात्री गोल्फ कोर्स मैदान जंगलात बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर फोटोमध्ये काही झाल्यानंतर वन खात्याने शोध मोहीम गोल्फ कोर्स जंगलातच चालू केली आहे.

वन खात्याचे डीएफओ एसीएफ चार आर एफ सहा 50 कर्मचाऱ्यांची टीम शोध मोहिमेत सतत कार्यरत आहे गोल कोर्स जंगल परिसरात 16 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते याशिवाय सात सापळे रचण्यात आले होते या सापळ्यात बिबट्याची आवडती शिकार ठेवण्यात आली होती.इतकेच काय तर बिबट्याला पकडण्यासाठी गदगहून वन खात्याने विशेष पथक बोलावले होते

Leapord image on bgm suddi
Leapord image publish on belgavi suddi.com

बिबट्याचा नागरी वस्तीतील वावर पाहता सोमवारी गोल्फ कोर्स मैदान परिसरातील जवळपास शाळांना सोमवारी सुट्टीचा आदेश देखील बजावण्यात आला होता.

नेहमी नागरी वस्तीमध्ये येणारा बिबट्या हा प्राण्याचा आवडतं खाद्य कुत्रा आहे तो नेहमी कुत्र्याची शिकार करत असतो मानवी वस्ती जवळ नेहमी येत असतो. बिबट्याची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे %LS����