बिबट्या रेस कोर्स परिसरात असल्याचे समजताच विद्यार्थ्यांच्या खबरदारीच्या दृष्टिकोनातून या परिसरतील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली होती. 8 दिवसाच्या कालावधीनंतर 16 ऑगस्ट पासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र बिबट्याचे दर्शन होताच सोमवार पासून शाळा बंद करण्यात आल्या आल्या.शाळा बंद करून चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुन्हा ऑनलाईन शिक्षणाची कास धरण्यात आली आहे.
बिबट्याला शोधण्याच्या मोहिमेला सातत्याने अपयश येत आहे.यामुळे अजून देखील बिबट्या जेरबंद झालेला नाही. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मागील चार दिवसापासून शाळा बंद आहेत.परिणामी सातत्याने शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी पुन्हा ऑनलाईन शिक्षणाची कास धरली आहे.या ठिकाणी क्लास वर्क शिवाय होमवर्क अशा माध्यमातून पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. प्रथम ऑनलाईन शिक्षण पद्धती ला विरोध झाला होता मात्र आता पालकांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन शिक्षण घेण्याची सवय झाल्याने अशा परिस्थितीत देखील शाळांनी निवडलेला ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी हितावह ठरू लागला आहे. काळात कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष हे पंधरा दिवस आधीच सुरू करण्यात आले होते. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गॅप भरून काढण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक मूल्यांबरोबरच मागील इयत्तांची शैक्षणिक मूल्य अभ्यासण्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
मात्र सदर 22 शाळांना मात्र सुट्टी दिल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे बिबट्याला शोधण्या साठी विविध प्रयत्न करून देखील या आठवड्यात बिबट्या अजूनही सापडलेला नाही यामुळे विद्यार्थ्यांची सुट्टी वाढविण्यात आली असून आता बिबट्या मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
16ऑगस्ट पासून शाळा खबरदारी घेण्याचे आदेश देत शिक्षण खात्याने शाळा सुरू केल्या होत्या मात्र या परिसरात बिबट्या आढळल्याने पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या आता मात्र बिबट्या मिळेल तोपर्यंत शाळा सुट्टी राहतील असेच दिसून येत आहे.