बेळगाव शहरात बिबट्याची दहशत पसरून पंधरा दिवसाचा कालावधी उलटला आहे. सोमवारी बिबट्याने चकवा देत वनविभाग आणि पोलीस विभागाच्या शोध मोहिमेचा फज्जा उडविला. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून बिबट्याच्या शोध मोहिमेत बेंगळूर येथील हेलिकॉप्टर हायटेक सेन्सर ड्रोन कॅमेरा ची एन्ट्री झाली आहे. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा कोंबिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे.
सोमवारी दिवसभर बिबट्याच्या शोध मोहिमेत कोंबिंग ऑपरेशन पार पडले. मात्र बिबट्याला पकडण्यात यश आले नाही, म्हणूनच आता कोंबिंग ऑपरेशनच्या दिमतीला बेंगलोर येथून हायटेक ड्रोन कॅमेरा मागविण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता आमदार अनिल बेनके यांनी या ठिकाणी भेट दिली.
आणि यानंतर पुढे सदर सेन्सर कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याला शोधण्याची शोध मोहीम सुरू झाली. सदर हेलिकॉप्टर हायटेक ड्रोन कॅमेरा चे वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा उडविल्यानंतर कॅमेराच्या सेन्सरच्या माध्यमातून वन्यजीव कॅमेरा मध्ये कैद होतो. मात्र पुन्हा सदर कॅमेरा चालविताना अडचण निर्माण झाली असून डिफेन्स एरियामध्ये ड्रोन कॅमेरे उडविण्यासाठी परवानगी आवश्यक आहे.
गोल्फ कोर्स परिसर रेड झोन मध्ये येत असल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होत होती. शिवाय यासाठी सेंटर डिफेन्सची परवानगीहि आवश्यक आहे.सदर परवानगीसाठी साधारण महिन्याभराचा कालावधी उलटणार असल्याने प्रतीक्षा करणे देखील शक्य नव्हते; मात्र बिबट्याच्या दहशतीत असताना वनविभगाने सदर कॅमेरा हातात घेऊन चालत सेन्सर च्या माध्यमातून बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे.
साधारण अडीचशे एकर परिसरात गोल्फ कोर्स परिसर पसरला असून सदर परिसर कॅमेऱ्याच्या माध्यमातून पिंजून काढण्यात येणार आहे. परिणामी कॅमेराच्या सेन्सरच्या माध्यमातून सेन्सरद्वारे बिबट्या नेमका कुठे लपून बसला आहे याची माहिती मिळणे शक्य होणार आहे.
सोमवारी दिवसभर कोंबिंग ऑपरेशन करून देखील बिबट्या जेरबंद झाला नसल्याने मंगळवारी सेन्सर हायटेक कॅमेरा द्वारे सुरू झालेली बिबट्या सर्च मोहीम प्रभावी ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
वन खात्याला अपयश आल्यास…खानापूर मधून एक्सपर्ट आणून मी स्वता मोहिमेत सहभागी होणार …आमदार बेनकेंचा इशारा|Belgaum Live| pic.twitter.com/5Ndu12KKMP
— Belgaumlive (@belgaumlive) August 23, 2022
#infraredartificialintelligencecamera