हलगा येथील तारिहाळ रोडवर जैन बस्ती समोर धारधार शस्त्राने सपासप वार करून भररस्त्यात निर्घृण खून केलेल्या आरोपीला घटना घडलेल्या चार तासांतच गजाआड केले आहे.
मूळचा कोंडसकोप्प गावचा सध्या शिंदोळी येथे वास्तव्यास असलेल्या गदगय्या रेवणय्या पुजारी वय 40 वर्षे याच्या मानेवर वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली होती.
कशासाठी झाला होता खून?
कोंडसकोप्प येथील विठ्ठल सांबरेकर वय 38 हा मयत गदगय्या हे दोघेही मित्र होते गदगय्या हा ज्योतिष सांगत होता गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पत्नीच्या गावी शिंदोळीत वास्तव्यास होता.आरोपी विठ्ठल सांबरेकर याने 2 वर्षांपूर्वी मयत गदगय्या याने 2 लाख रुपये दिले होते ते परत देण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तगादा लावला होता मात्र पैसे परत करायची मागणी म्हणावी तितकी गंभीरपणे घेतली नव्हती ज्यावेळी मागणी नव्हती त्या त्या वेळी बेजबाबदारीची उत्तरे मिळत होती त्यामुळे विठ्ठलने गदगय्याचा काटा काढायचे ठरवले होते त्यानुसार तो संधीची वाट बघत होता शुक्रवारी सायंकाळी त्याने संधी साधत धारधार शस्त्राने खून केला.
शुक्रवारी आरोपी विठ्ठल सांबरेंकर कोंडस्कोप हुन शिंदोळीला आला होता त्यानंतर दोघेही सांबऱ्याला गेले गदगय्या धारवाडहुन रेल्वेने चेन्नईला जाणार होता.सांबऱ्याहुन गदगय्याच्या दुचाकीने शिंदोळीकडे निघाले त्यानंतर शिंदोळी हुन कोंडस्कोप कडे जात होते त्यावेळी गदगय्या हा दुचाकी चालवत होता तर विठ्ठल मागे बसला होता. हलगा येथे दुचाकी थांबवल्या वर गाडी चालू करताना पाठी मागे बसलेल्या विठ्ठल यावे धारधार चाकूने मानेवर सपासप वार करत त्याचा निर्घृण खून केला व घटनास्थळा वरून फरारी झाला होता
घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोर्लिंगय्या डीसीपी रवींद्र गडादी आदींनी पाहणी केली होती तर पोलीस निरीक्षक विजय शिंनूर यांनी पंचनामा केला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंनूर यांनी तपासाची चक्रे फिरवत रात्री आरोपी विठ्ठल याला अटक केली आहे.