Saturday, December 21, 2024

/

महामार्गावरील दरोडेखोरांना अटक : हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई

 belgaum

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याचे ४ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. पुन्हा त्याच व्यक्तीचे अपहरण करून पुन्हा २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

२१ ऑगस्ट रोजी मुत्नाळ या गावातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर वन विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्याची अडवणूक करून त्यांच्याजवळील ४ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे अपहरण करून २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.

यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी एस व्ही गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय विजयकुमार सिन्नर आणि सहकाऱ्यांनी बेळगावमधील छत्रपती शिवाजी नगर येथील गुटगुद्दी येथील रहिवासी लगमाप्पा कोळ्यानाईक (वय ३०),Hirebagewadi police

मुत्यानट्टी येथील दुर्गम्मागल्ली येथील रहिवासी प्रकाश गौरव (वय २६), मूत्यानट्टी येथील मारुती गल्ली येथील रहिवासी कल्लाप्पा होण्णांगी (वय २९), मास्तमर्डी येथील विठ्ठल गल्ली येथील रहिवासी मारुती बर्मानी (वय २०) आणि मूत्यानट्टी येथील दुर्गम्मा गल्ली येथील रहिवासी विशाल तलवार ( वय २३) अशा पाच आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ३ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, ४ लाख रुपयांचे चारचाकी (स्कॉर्पिओ) वाहन, प्लास्टिक आणि फायबरच्या डमी पिस्तूल, लायटर, चाकू, लोखंडी रॉड, जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.