Wednesday, January 22, 2025

/

खरेदीसाठी रस्त्यावर अवतरला अलोट जनसागर

 belgaum

लाडक्या बाप्पाच्या स्वागताच्या तयारीची खरेदी करण्यासाठी आज सायंकाळी श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत अलोट गर्दी होऊन जणू जनसागरच रस्त्यावर अवतरला आहे.

उद्या होणाऱ्या श्री गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आज मंगळवारी श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली आहे. विशेष करून गणपत गल्ली या बाजारपेठेच्या प्रमुख मार्गावर प्रचंड गर्दीमुळे पाय ठेवण्यासही जागा नव्हती. येथील असंख्य फळ विक्रेते, सजावटीचे साहित्य, कापड विक्री, भाजीपाला आदी दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहावयास मिळत आहे.

गर्दी चोरट्यांच्या पथ्यावर…

गणेश उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत झालेली प्रचंड गर्दी खिसेकापू आणि चोरट्यांच्या पथ्यावर पडली होती. गणपत गल्ली परिसरात गर्दीचा फायदा घेऊन खरेदी आलेल्या महिलांच्या हातातील जवळपास 7 मोबाईल संच लंपास करण्यात आल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे गणेशोत्सव काळातील गर्दीप्रसंगी नागरिकांनी चोरट्यांपासून सावध राहणे गरजेचे बनले आहे.

इथेच का होते गर्दी

श्री गणेशोत्सवाप्रमाणे कोणताही सण असो त्याच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी ही होतेच. मात्र ही गर्दी का होते? जुन्या जाणकार मंडळींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे निदर्शनास आले की मुख्यतः किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली रविवार पेठ आणि खडेबाजार हाच शहरातील बाजारपेठेचा प्रमुख भाग आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या या ठिकाणी कपडेलत्ते, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, अन्नधान्य, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, सोन्याचांदीचे दागिने आदी सर्व प्रकारची दुकाने आणि शोरूम्स आहेत. Rush

त्यामुळे गणपती असो दिवाळी असो अथवा अन्य कोणताही सण असो या ठिकाणी फक्त बेळगाव शहरातीलच नव्हे तर लगतच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील नागरिकांचीही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ये -जा सुरू असते. बेळगाव शहर विस्ताराने वाढले असले तरी शहराची बाजारपेठ अद्याप म्हणावी तशी विस्तारलेली नाही. एका ठराविक परिसरात खरेदीचे सर्व साहित्य उपलब्ध होत असल्यामुळे उपरोक्त पाच -सहा मार्ग हीच अजूनही बेळगावची मुख्य बाजारपेठ आहे. याखेरीज उपनगरात बाजारपेठ असली तरी तेथील बहुतांश नागरिक शहरातील मुख्य बाजारपेठेत येऊन खरेदी करण्यास अधिक पसंती देतात.

त्यामुळेच प्रत्येक सणाला नागरिक खरेदीसाठी विखुरले न जाता मुख्य बाजारपेठेत त्यांची आज श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला जशी तोबा गर्दी झाली आहे तशी गर्दी होत असते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.