गॅस गळती झाल्याने ओमनी कारने पेट घेतल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात शुक्रवारी सकाळी घडली त्यामुळे या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संकेश्वर बस स्थानका जवळ कार मधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कार चालक गाडीतून बाहेर पडला कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र कार पेट घेतला या घटनेत कार आगीत जळून खाक झाली.
आग पेट घेतेवेळी शेकडो बघ्यानी गर्दी केली होती यावेळी काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत भेटणाऱ्या कारची आग विझवली संकेश्वर शहरात दिवसभर या घटनेची चर्चा सुरू झाली होती