माणसाचे मैत्र जुळण्यासाठी काही कारणे आवश्यक असतात, लाखों माणसं एकमेकां समोरून जात रहातात पण मनाचे धागे जुळण्यासाठी एक क्षण,एक कारण उपयोगी पडते.दोन चाकावर हळवी काळिजे घेऊन भिरभिरणारी काही मनं, एकत्र जुळली ती एका विशिष्ट हेतूने…
वेणूग्राम सायकलिंग क्लब (vcc)या संस्थेच्या लोकांचा जीव आहे तोच मूळचा बेळगाववर म्हणूनच निसर्ग प्रेमी असलेल्या या संस्थेने वेणूग्राम हे नाव स्विकारत सायकल सफरी चालू केल्या!त्यातला मूळ उद्देश हा निसर्गाचा मान राखण्याचा, प्रदूषण रहित गाव आणि मनस्वास्थ या गोष्टीशी निगडित असणारे हे लोक जमतात ते आरोग्याच्या आणि बेळगावच्या ओढीने….पहिला बेळगाव बेळगावचा परिसर ,निसर्ग आणि निसर्गाला अबाधित राखण्यासाठी मनेच्छा असणारे सर्वजण…
आज 7 आगष्ट फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री दिन….बेळगावच्या वेणूग्राम सायकलिंग क्लबने हा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.नॉर्मली फ्रेंडशिप डे म्हणजे मित्र मैत्रिणी एकत्र जमतात,पार्टी करतात बाहेर फिरायला जातात आणि मजा करतात. मात्र या सगळ्याला फाटा देत वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावच्या सदस्यांनी एकत्र भेटून पहाटेची 40 कि. मी . राईड पूर्ण केली.आर पी डी कॉर्नर पासून महीपाल गडा वर जाऊन येत एकमेकांना आर पी डी वर येऊन शुभेच्छा दिल्या.
रविवारी सकाळी पासून बेळगाव शहर आणि परिसरात धुवाधार कोसळणारा पाऊस देखील त्यांच्या मैत्री आड येऊ शकला नाही किंबहुना आपल्या धारानी त्याने त्यांचे मित्रत्व चिंब भिजवून टाकले.
वेणूग्राम सायकलिंग क्लबचे अध्यक्ष संतोष शानभाग यांनी ‘जसे आरोग्य ही संपत्ती आहे.. तशी निरोगी मित्र’ हीसुद्धा मोठी श्रीमंती आहे असे सांगत फ्रेंडशिप डे च्या आगळी वेगळी बायसिकल राईड पूर्ण केलेल्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
रविवारी सकाळी पासून बेळगाव शहर आणि परिसरात धुवांदार कोसळणारा पाऊस देखील त्यांच्या मैत्री आड येऊ शकला नाही किंबहुना आपल्या धारांनी त्याने त्यांचे मित्रत्व चिंब भिजवून टाकले.
वेणूग्राम सायकलिंग क्लबचे अध्यक्ष संतोष शानभाग यांनी “जसे आरोग्य ही संपत्ती आहे तशी निरोगी मित्र हे मोठी श्रीमंती आहे” असे सांगत फ्रेंडशिप डे च्या आगळी वेगळी बायसिकल राईड पूर्ण केलेल्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
रविवारी सकाळी पासूनच घराबाहेर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांनी फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा सोशल मीडिया आणि फोन द्वारे दिल्या असताना बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये निरोगी आरोग्यासाठी पर्यावरणासाठी सायकलिंगचा संदेश देणाऱ्या या ग सायकलिंग क्लबचे कौतुक करावे तितके कमीचं आहे. टीम बेळगाव Live कडून देखील सायकल मारत पर्यावणाचे जतन आणि आरोग्यासाठी संदेश देणाऱ्या वेणूग्राम क्लबच्या सदस्यांना हॅपी फ्रेंडशिप डे….
#Happy Friendship day to all