शुक्रवारी दुपारी जाधव नगर परिसरात गवंडी कामगारावर हल्ला करून किरकोळ जखमी केलेल्या बिबट्याला शोधण्याची मोहीम वन खात्याने सलग तिसऱ्या दिवशी चालूच ठेवली आहे .
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी पासून बिबट्याच्या शोध मोहिमेचा केंद्रबिंदू बेळगावच्या गोल्फ कोर्सकडे वळवला असून वनविभागाने या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले.
भीमगड वन परिक्षेत्रासह विविध वन परिक्षेत्रातील कर्मचार्यांसह ए सी एफ रेंजर्स सह सुमारे 50 जणांच्या मोठ्या चमूने गोल्फ कोर्सवर कोम्बिंग ऑपरेशनात सहभाग घेतला आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या ज्या भागात फिरणे अपेक्षित होते, त्या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या सात कॅमेरा ट्रॅपपैकी एका कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्याची छायाचित्रे पकडली असून, त्याच्या अस्तित्वाची पुष्टी पुन्हा एकदा झाली आहे. मात्र यावेळी ते रेसकोर्स परिसरात आहे. मात्र बेळगाव परिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश अर्जुनवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरा ट्रॅपद्वारे अशी कोणतीही छायाचित्रे टिपल्याचा इन्कार केला.
यापूर्वीच विविध ठिकाणी 3 पिंजरे ठेवण्यात आले आहेत इतर ठिकाणांहून 4 पिंजरे मागवण्यात आले आहेत त्यामुळे आता पिंजऱ्यांची संख्या सात वर पोहोचली आहे त्यामुळे लवकरच बिबट्या जेरबंद होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पोलीस विभागाने रेसकोर्स आणि गोल्फ कोर्सच्या आजूबाजूच्या भागात विशेषत: जाधव नगर, हनुमान नगर, आणि जलतरण तलाव आणि आतापर्यंत बिबट्या दिसलेल्या ठिकाणी अलर्ट जारी केलेला रविवारी देखील जारी केला आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पगच्या खुणा तपासून त्या पाऊलखुणा बिबट्याच्या असल्याची खात्री केली. पोलिसांनी हनुमान नगर, जाधव नगर आणि आजूबाजूच्या परिसरांरातील नागरिकांना बिबट्याच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे, स्थानिक रहिवाशांना विशेषत: अंधारात आणि पहाटेच्या वेळी विनाकारण फिरू नये असा इशारा दिला आहे.
परिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश अर्जुनवाड यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले की मानवी वस्तीत चुकून घुसलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभाग चोवीस तास काम करत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी उशिरा कॅमेरा ट्रॅपमधून बिबट्याचे छायाचित्र मिळाले. त्याच अनुषंगाने नेसरगी, काकती, बेळगाव आणि भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रेसकोर्स परिसरात बिबट्याच्या शोध मोहिमेसाठी जमा करण्यास सांगितले होते. बिबट्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून ते रेसकोर्स परिसरात विविध भागात पसरले आहेत.
बिबट्याकडून मोराची शिकार?
दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दोन मोरांचे शिकारीचे पुरावे सापडले असून, त्यांना एकाच बिबट्याने मारले असल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.