Sunday, December 22, 2024

/

अब,हाथी बनेंगे साथी!

 belgaum

बेळगाव शहरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे तब्बल पंधरा दिवसाचा कालावधी उलटून देखील बिबट्या अजून हाती सापडलेला नाही. कधी शोध मोहिमेचा फज्जा तर कधी हातावर तुरी देत बिबट्या निसटत आहे. यामुळे आता बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाचे ”हाती बनेंग साथी”. हो शिमोगा येथून दोन हत्ती बिबट्याला शोधण्या साठी दाखल होणार आहेत.

शोधण्याची मोहीम आता तीव्र करण्यात आली असून याच अनुषंगाने सोमवारी झालेल्या प्रकारानंतर तातडीने मंगळवारी बिबट्याला शोधण्यासाठी हाती मागविण्यात आले आहेत सक्रेबैल जंगल, शिमोगा येथील हत्ती सकाळी बेळगावला येण्यासाठी रवाना करण्यात आले असून सायंकाळपर्यंत सदर हत्ती बेळगावात दाखल होणार आहेत त्यानुसार वनविभाग पोलीस विभाग आणि हत्ती यांच्या माध्यमातून बिबट्याला शोधण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आता बिबट्याला पकडण्यासाठी हत्ती हे वनविभागाचे साठी बनणार आहेत.

27 ट्रॅप कॅमेरे सात पिंजरे,200 वन खात्याचे आणि 200 पोलीस कर्मचारी,विशेष प्रशिक्षण दिलेली कुत्री,2 ट्रांझ्याक्यूतर बंदुका सह शार्प शूटर आणि बेळगावातील समाजसेवकांची मोठी टीम यांसह उत्तरचे आमदार अनिल बेनके यांचा सातत्याने चाललेला पाठपुरावा असे ऑपरेशन मिशन बिबट्या जेरबंद सुरू आहे मात्र त्याला अपयश येताना दिसत आहे.Leapord on road

बिबट्या या भागात घर करून असल्याचे बोलले जात असून या भागातील एका कामगाराचे असे म्हणणे आहे की सदर बिबट्या दोन वर्षांपूर्वी बछडा म्हणून या ठिकाणी दिसला होता. तो बिबट्या आता मोठा झाला असून एका शिकाऱ्याने त्या बिबट्याला या ठिकाणी सोडले होते.मात्र आता मोठा झालेला तो बिबट्या सर्वांच्या नजरेला पडत असून या ठिकाणी राहून तो माणसाळलेला आहे.

या भागात नेमका जंगल परिसर कोणता आपल्याला शिकार कोठे मिळते.मानवी वस्ती कोणती, या भागातील रस्ते कोणते याची सर्व माहिती बिबट्याला झाली असून आता बिबट्या बेळगावचा जणू जावई बनला आहे.यामुळे मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला शोधणयासाठी आता हत्तीच फायदेशीर ठरतील असे म्हटले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.