महापौर उपमहापौर निवडीचे भिजते घोंगडे तसेच पडून असून यामुळे बेळगाव शहराचा विकास खुंटला आहे यामुळे तात्काळ महापौर उपमहापौर निवडणूक घ्यावी अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केली आहे सदर मागणीचे निवेदन त्यांनी रिजनल कमिशनर कार्यालयात उपस्थित राहून आर सी यांना दिले आहे. वॉर्डातील विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे पाऊल उचलण्यासाठी सदर निवड महत्त्वाची असून तात्काळ निवड व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक वर्षाचा कालावधी झाला आहे.मात्र अजूनही महापौर,उपमहापौर निवडणूक झालेली नाही शिवाय नगरसेवकांचा शपथविधी देखील पार पडलेला नाही परिणामी आपल्या वॉर्ड मधील समस्यां बरोबरच विविध विकास कामे करत असताना समस्याचा सामना करावा लागत आहे.यासाठी तात्काळ महापौर महापौर निवडून विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या कार्यभारावर होणारा परिणाम याचा विचार करून लवकरात लवकर सदर निवड व्हावी अशी मागणी नगरसेवकांमधून होत आहे.सदर लांबलेल्या निवडीमुळे महानगरपालिकेचा कार्यभार आणि यामुळे मनपावर होणारा परिणाम याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिणामी सर्वसामान्य नागरिकांना कचरा पाणी अशा रोजच्या समस्या भेडसावत आहेत.
या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा केला जात आहे मात्र महापौर उपमहापौर निवडीचे भिजते घोंगडे तसेच पडून राहिल्यामुळे या सुविधा देखील पुरविताना समस्या येत असून तात्काळ निवडीची प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी विविध वॉर्डचे 17 हुन अधिक नगरसेवक उपस्थित होते.वैशाली सिद्धार्थ भातकांडे, पूजा पाटील,रवि साळुंके शिवाजी मंडोळकर,बसवराज मोदगेकर,शिवाजी मंडोळकर,तसेच विविध भागातील नगरसेवक उपस्थित होते.