गरीब असहाय्य शेतकऱ्यांना हाताशी धरुन कांही दलाल अलीकडे शेतकऱ्यांला अत्यल्प रक्कम देऊन पिकाऊ जमीनीत भराव घालून छोटा शेड मारुन प्लॉट पाडवून विक्रि करत आहेत. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा गैरप्रकार तात्काळ थांबवावा अशी मागणी करण्यात येत आहे.
यरमाळ रोड शहापूर शिवारात लाड फार्म हाऊसच्या पूढे एक शेड बांधला होता. तिथे आत ठेवलेली वेल्डिंग मशीन तसेच पुढे माळवी यांच्या शेडचे दरवाजे फोडून सर्व साहित्य चोरानीं चोरुन नेल आहे. तशी वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे.
तेंव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांची सहमती न घेता असे बेकायदेशीर प्लॉट पाडवून विक्राचा घाट रचला जात असल्याचा या भागातील शेतकऱ्यांचा आरोप आहे. याचबरोबर संबंधित ठिकाणी उडानटप्पू युवकांच्या रंगीत पार्ट्याही सुरु असल्याने शेतात कामाला जाणाऱ्या महिलांमधे भितीचे वातावरण आहे. सदर परिसरात कष्टकरी शेतकरी आहेत.
तेंव्हा उपरोक्त गैरप्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पिकाऊ जमिनीतील बेकायदेशीर कृत्यं ताबडतोब बंद करावीत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
तसेच या मागणीची पूर्तता न झाल्यास बेळगाव शहर व तालुका रयत संघटनेतर्फे संबधीत खात्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढून जाब विचारण्यात येईल. त्याचप्रमाणे मा. लोकायुक्त यांच्याकडेही दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.