बेळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन केंद्रातील नोंदीनुसार जुलै महिन्यात बेळगाव, खानापूर आणि हुक्केरी वगळता सर्व ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बेळगाव, खानापूर व हुक्केरी येथे अनुक्रमे -6.75, -17.98, -9.67 टक्के इतका कमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील अथणी, गोकाक, मुडलगी, रायबाग, रामदुर्ग व सौंदत्ती येथे सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडला आहे. बेळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन केंद्रात संपूर्ण जुलै महिन्यात नोंदविला गेलेल्या पावसाची टक्केवारी मिलिमीटरमध्ये (अनुक्रमे जुलै महिन्यातील सर्वसामान्य पाऊस -पडलेला पाऊस, एकूण टक्केवारी यानुसार पुढील प्रमाणे आहे.
अथणी : 65 मि. मी. -114.16 मि. मी. (75.63 टक्के), बैलहोंगल : 129 मि. मी. -160.6 मि. मी. (24.50 टक्के), बेळगाव आयबी : 455 मि. मी. -424.3 मि.मी. (-6.75 टक्के), चिक्कोडी : 134 मि. मी. -196.8 मि. मी. (46.87 टक्के), गोकाक : 68 मि. मी. -120 मि. मी. (76.47 टक्के), हुक्केरी : 150 मि. मी. -135.5 मि. मी. (-9.67 टक्के),
कागवाड शेडबाळ : 68.5 मि. मी. -123.4 मि. मी. (80.15 टक्के) खानापूर : 756 मि. मी. -620.1 मि. मी. (-17.98 टक्के) कित्तूर : 270 मि. मी. -288.1 मि. मी. (6.70 टक्के), मुडलगी : 67 मि. मी. -170.3 मि. मी. (154.18 टक्के),
निपाणी : 201.8 मि. मी. -294.4 मि. मी. (45.89 टक्के), रायबाग : 74 मि. मी. -126 मि. मी. (70.27 टक्के), रामदुर्ग : 64 मि. मी. -119.1 मि. मी. (86.9 टक्के) सौंदत्ती 76 मि. मी. -134.2 मि. मी. (76.56 टक्के).