Tuesday, January 14, 2025

/

हा अवजड वाहतूक बंदीचा फज्जा आहे का?

 belgaum

सकाळी आठ ते 11 या वेळेत कॅम्प परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश पोलिसांनी बजावला आहे असे असताना शुक्रवारी सकाळी 8:45 वाजता कॅम्प मधील सेंट जोसेफ शाळेसमोरून ट्रक ये जा करत होते त्याचे फोटो अनेक पालकांनी कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

जर पोलिसांनी आदेश बजावून देखील अवजड वाहना सकाळच्या वेळेत शाळा परिसरातील रस्त्यावरून येजा करत असतील तर अवजड वाहतूक बंदीच्या पोलिसांच्या आदेशाचा हा फज्जा आहे असंच म्हणावं लागेल.

गेल्या चार दिवसांमध्ये दोन  शाळकरी मुलांचे बळी अवजड वाहनानी ठोकर दिल्याने झाले होते त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने गुरुवारी दुपारी स्पीडब्रेकर घालण्याचे काम हाती घेतले होते याशिवाय सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश देखील बजावण्यात आला होता मात्र केवळ एका दिवसातच कॅम्प मधील शाळा समोर अवजड वाहने ये जा करताना दिसत आहेत.

बुधवारी सकाळी अपघात झाल्यानंतर गुरुवारी सकाळच्या सत्रात रहदारी पोलिसांनी जवळपास 60 ऊन अधिक अवजड वाहनांना बेळगाव शहराच्या एन्ट्री पॉईंटवर अडवून ठेवले होते मात्र शुक्रवारी सकाळचं चित्र वेगळे आहे शुक्रवारी सकाळी कॅम्प मधल्या शाळा परिसरामध्ये अवजड वाहने ये जा करत असल्याचं चित्र दिसल्याने पालक वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.Heavy vehicle st joseph

ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी काय करावे लागेल?

बेळगाव रहदारी पोलिसांसमोर आता रहदारी व्यवस्थापन कसे करावे म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं करायला हवं? या तोडगा कसा काढला जावा यावर प्लॅन तयार करावा लागणार आहे.

एकीकडे बेळगाव शहरांमध्ये फ्लाय ओव्हर, उड्डाणपूलांची संख्या वाढली पाहिजे तरच ट्रॅफिक मॅनेजमेंट करता येईल आणि मेट्रोपॉलिटीन सिटी प्रमाणे बेळगाव मध्ये देखील रहदारीचे नियंत्रण व्यवस्थित होईल यासाठी स्थानिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी या सर्वांचे सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बेळगावात फ्लाय ओव्हर ची संख्या वाढली पाहिजे अशी मागणी केली होती आता या मागणीचा पाठपुरावा आता सगळ्यांनी करणे गरजेचे आहे. ओल्ड गांधीनगर पासून वाया बस स्टँड राणी चन्नम्मा सर्कल आणि के एल ई इस्पितळापासून वाया चन्नमा सर्कल धर्मवीर संभाजी चौक ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंत असे दोन जरी मोठे फ्लावर करण्यात आले तरी देखील बेळगावचा रहदारी चा ताण कमी होईल याशिवाय नवीन रस्ते करण्यासाठी जमीन देखील संपादन करण्याची गरज भासणार नाही असे जाणकारांचे मत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.