बेळगावात विजेच्या गडगडाटासह मध्यम पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या नंतर बेळगाव शहर परिसरात 20 जुलै नंतर म्हणावा तितका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी चिंता करत असताना हवामान खात्याने बेळगाव सह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस विजेच्या गडगडाटासह पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार वाऱ्याचा वेग 30 ते 40 ताशी किलोमीटर असा आहे त्यामुळे आगामी तीन तासात मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर कन्नड उडपी दक्षिण कन्नड बेळगाव बागलकोट धारवाड कोपळ हावेरी कलबुर्गी आधी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.बेंगलोर हवामान खात्याकडून मंगळवारी सकाळी सात वाजता हा संदेश जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळीच बेळगाव शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे अनेकांनी थंडीचे कपडे घालूनच घराबाहेर पडणे पसंत केले होते. सोमवारी दुपारी किरकोळ पाऊस झाला होता आता मंगळवारी हवामान खात्याने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे असे असताना शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठ्या पावसाची गरज व्यक्त होत आहे.