नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अफेअर्स तर्फे दिला जाणारा स्मार्ट सिटी पुरस्कार बेळगाव स्मार्ट सिटीला मिळाल्यामुळे उलट सुलट चर्चेला उत आला आहे.
अनेक सामाजिक संस्था,कार्यकर्त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्ज्याबाबत आणि गलथान पणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.पण तरीही बेळगावला स्मार्ट सिटी योजनेतील पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.स्मार्ट सिटीची कामे सुरू होवून चार वर्षाचा कालावधी लोटला आहे.
अद्याप चार वर्षापूर्वी सुरू झालेली रस्त्याची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. मंडोळी रोड हे एक फक्त उदाहरण आहे.या अपुऱ्या कामामुळे एका व्यक्तीला प्राणाला मुकावे लागले आहे.स्मार्ट सिटी कामाबाबत आम आदमी पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित करून वेळोवेळी आंदोलने छेडली आहेत पण लोकप्रतिनिधी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळे आज पर्यंत स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार आणि पात्रता नसलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही.
लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील अधिकारी असल्याने कोणीही कितीही तक्रारी केल्या तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही.नवीन रस्ते करायचे आणि पुन्हा पाईप लाईन घालण्यासाठी खोदाई करायची.अशी अनेक कामे बेजबाबदार पणे करण्यात येत आहेत.
बेळगाव शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे त्याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही .पावसाळ्यात देखील आठ दहा दिवसांनी नळाला पाणी येते.अशी ग्राउंड लेव्हल रिॲलिटी असताना बेळगावला स्मार्ट सिटी पुरस्कार कोणत्या आधारावर मिळतो याचे गूढ आता नागरिकांनाच उलकावे लागणार आहे.