बेळगाव जवळील इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये दोन एके 47 बंदूक चोरी गेल्याची घटना गुरुवारी घडली आहे त्यामुळे खळबळ माजली आहे.
बेळगाव तालुक्यातील हालभावी येथे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्र मधील संदीप मीना आणि राजेश कुमार या दोघांकडे असलेल्या एके ४७ च्या बंदूक चोरीला गेल्या आहेत.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार नक्षलवादी विरोधी पथकाचे मदुराई 45 बटालियन यांचे बेळगावच्या हालभावी मध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू आहे.17 ऑगस्ट रोजी हालभावी येथील कॅम्प मध्ये दोन बंदूक घेउन झोपलेल्या जवानांकडील बंदूक चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच लागलीच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि सदर बंदूक नेमक्या कोणी चोरी केल्या याचा देखील तपास सुरू केला आहे.
या संदर्भात पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आलेली असून बेळगावच्या रहदारी आणि गुन्हे विभागाच्या डीसीपी पी व्ही स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदूक शोधण्याचे तपास कार्य सुरू झाले आहे.
गेल्या 24 तासापासून आयटीबीपी च्या ट्रेनिंग सेंटरमध्ये बंदूक एके 47 चोरी केल्याच्या घटनेचा तपास सुरू आहे.याप्रकरणी भारतीय शस्त्र कायदा नियमानुसार काकती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.