Sunday, December 29, 2024

/

सीईएन ‘सिंघम रिटर्न्स’! बेळगावमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली!

 belgaum

सीईएन ‘सिंघम रिटर्न्स’! बेळगावमध्ये आणखी एका पोलीस अधिकाऱ्याची बदली!

बेळगाव : बेळगावातील बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे. बेळगाव मार्केट ए सी पी सदाशिव कट्टीमनी यांची बदली गुन्हे विभागाचे एसीपी म्हणून तर गुन्हे विभागाच्या एसीपीपदी एन. व्ही. भरमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बेळगाव शहरातील अनेक पोलीस स्थानकात महत्वाचे बदल केले आहेत.

मागील काहीं दिवसापूर्वी कर्नाटक लोकायुक्तमध्ये बदली झालेले बेळगाव शहर सायबर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची बेळगाव जिल्हा सीईएन पोलीस स्थानक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहापुर पोलीस विनय बडीगेर यांची बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचप्रमाणे सुनील कुमार एच. यांची शहापूर पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्यमबाग पोलीस निरीक्षक धिरज शिंदे यांची डीसीआरई पदी बदली झाली आहे तर धारवाड हुबळी मधील रमेश हुगार आणि भाऊसाहेब जाधव यांच्या बदल्याही त्याच शहरात झाल्याचे आदेश आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.