बेळगावमध्ये अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा वडगाव रस्त्यावरील बेळळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिल समोर दुचाकीचा अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
चंद्रकांत पारीस कांबळे वय 24 राहणार येळळूर असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे तो येळळूरकडून वडगावच्या येळळूर के एल ईइस्पितळाकडे येत होता त्यावेळी हा अपघात झाला आहे.
सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास हि घटना घडली असून ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात ऍक्टिव्हा वरून जाणाऱ्या इसमाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
गाडी घसरून रस्त्याच्या शेजारी पडलेल्या इसमाने हेल्मेट न घातल्याने त्याचे डोके फुटले आहे. हा अपघात इतका भीषण होता कि यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात या घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.