पर्यावरणाची सुंदरता अनुभवण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने पश्चिम घाट आणि दूध सागर धबधब्यापासून एक विशेष विस्टाडोम ही रेल्वे कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे. लवकरच सदर रेल्वे कार्यान्वित होणारा असून त्यामुळे आता पर्यटकांना पर्यावरणाची सुंदरता विस्टाडोम या विशेष ट्रेनमधून अनुभवता येणार आहे. हुबळी वास्को रेल्वेला हा कोच जोडण्यात येणार आहे त्यामुळे
बेळगावच्या पर्यटकांना बेळगाव ते लोंढा प्रवास करून पुढे हुबळी ते वास्को या रेल्वेतून निसर्गाची पर्यावरणाची सफर करता येणार आहे.
निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी पश्चिम घाट आणि दूध सागर परिसरात विस्टा डोम कोच ही विशेष रेल्वे व्यवस्था करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.जंगल पर्वते त्याचबरोबर नद्या ,धबधबे अशा विविध निसर्ग सौंदर्याचा अनुभव रेल्वेतून प्रवास करताना घेता यावा यासाठी सातत्याने ही मागणी करण्यात येत होती. याकरिता रेल्वे विभागाने दक्षिण रेल्वे,कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांनी ही मागणी पूर्ण केलीआहे.
या रेल्वे बाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की विस्टाडोम कोच असलेली रेल्वे म्हणजे पूर्णा एक्सप्रेस रेल्वे जी एर्नाकुलम पासून पुणे, बेळगाव, लोंढा ,दूध सागर ,मडगाव ,कारवार आणि मंगळूर यापासून चालते. ही एक उपयुक्त ट्रेन असून द्वि साप्ताहिक संचलित करण्यात येणार असून चार राज्यातील पर्यटन स्थळे आणि पश्चिम घाट याचा भाग या ट्रेनमधून पाहता येतो.
बेळगाव ,लोंढा ,दूध सागर ,मडगाव ,कारवार, गोकर्ण, मुर्देश्वर, उडुपी, मंगलुरु या भागातून पुढे पुण्यापासून एर्नाकुलम असा प्रवास करत असून यामुळे पर्यटकांना या भागात असणारा प्रकृतीचा आणि पर्यावरणाचा अनुभव घेता येणार . यासाठी बेळगावकर मंडळींना बेळगाव ते लोंढा असा प्रवास करून पुढे हुबळी वास्को या ट्रेनमध्ये बसून ही विशेष निसर्गाची सफर अनुभवता येणार आहे.