Friday, November 15, 2024

/

कोयना जलाशयातून 2100 क्यू. पाण्याचा विसर्ग

 belgaum

महाराष्ट्रातील कोयना जलाशयामधून सध्या कोयना नदीमध्ये 2100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असून या जलाशयाची पाणी पातळी आज गुरुवारी पहाटे 5 वाजता 2101.02 फूट (640.436 मी.) इतकी होती.

कोयना जलाशयाची पाणीसाठा क्षमता सुमारे 44.71 टीएमसी (42.48 टक्के) इतकी आहे. या जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी जलाशयामध्ये 48,427 क्यूसेक्स इतके मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे जलाशयाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

जलाशयातून आज गुरुवारी 2100 क्यूसेक्स पाणी बाहेर कोयना नदीत सोडण्यात येत आहे. आज पहाटे 5 वाजता जलाशयातील पाण्याची पातळी 2101.02 फूट (640.436 मी.) इतकी होती. दरम्यान कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथील पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी आज अनुक्रमे 33 मि.मी., 18 मि.मी. व 65 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती अशी

58 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 144.56 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव व तारळे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव, तारेवाडी व अडकूर, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व सुळंबी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे, पणुंद्रे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी असे 58 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 144.56 दलघमी, तुळशी 58.98 दलघमी, वारणा 609.98 दलघमी, दूधगंगा 368.73 दलघमी, कासारी 55.82 दलघमी, कडवी 46.82 दलघमी, कुंभी 46.32 दलघमी, पाटगाव 62.52 दलघमी, चिकोत्रा 26.70 दलघमी, चित्री 30.37 दलघमी, जंगमहट्टी 22.48 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 28.08 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 36.10 फूट, सुर्वे 35.1 फूट, रुई 65 फूट, इचलकरंजी 60.6 फूट, तेरवाड 55.3 फूट, शिरोळ 47.9 फूट, नृसिंहवाडी 47.6 फूट, राजापूर 35.9 फूट तर नजीकच्या सांगली 19.3 फूट व अंकली 24.2 फूट अशी आहे.
0000

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.