बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विलास अध्यापक यांची निवड एकमताने करण्यात आली. तसेच उपाध्यपदी महेश काशीद, कार्यवाह म्हणून शेखर पाटील, सहकार्यवाह म्हणून गुरूनाथ भादवणकर व सुहास हुद्दार यांची परिषद प्रतिनिधी म्हणून फेरनिवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2022-23 सालासाठी नूतन पदाधिकार्यांची ही निवड झाली. अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते. सदानंद सामंत, राजेंद्र पोवार यांची यावेळी नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. तसेच प्रकाश माने यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कार्यकारिणीच्या जागेवर परशराम पालकर यांची नियुक्ती करण्यात आली.
विलास अध्यापक गेल्या तीसहून अधिक वर्षापासून बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते एबीपी माझा , महाराष्ट्र टाइम्स आणि महासत्ताचे बेळगाव प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
बेळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेळगाव सह सीमा भागातील मराठी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कटिबंध राहू आणि पत्रकार संघाची वाटचाल त्यासाठीच राहील असे अध्यापक यांनी निवड झाल्यावर बेळगाव live शी बोलताना बोलताना सांगितले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाला सुरुवाती पासून महाराष्ट्र शासनाचे आणि सर्वपक्षीय नेते मंडळींचे सहकार्य लाभत आले आहे.पत्रकार संघातर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत .पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत .जनतेसाठी देखील वेगवेगळ्या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असेही विलास अध्यापक यांनी सांगितले.