कॅन्टोन्मेंट बोर्ड चे माजी उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख हे नेहमीच सामाजिक कार्यासाठी धडपडत असतात आणि कॅम्प भागात तर कोणतीही सामाजिक कार्य असेल तर ते साजिद शेख यांच्याशिवाय पूर्ण होणे क्वचितच असते.
याआधीही रस्त्यावर पडलेली अनेक झाडे बाजूला काढून रस्ता सुरू करण्याचे कार्य करणाऱ्या साजिद शेख आणि सहकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी कॅम्प भागांत घरावर पडलेल झाड बाजूला काढत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे.
सध्या बेळगाव शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसात अनेक घरांची आणि झाडांची पडझड होत आहे असाच एक जुनाट गुलमोहर कॅम्प मधल्या 112 बीसी महेंद्र देशपांडे यांच्या बंगल्यावर कोसळला होता.
मोठा गुलमोहरचा वृक्ष कोसळल्याने महिंद्र देशपांडे यांनी सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांना मदतीसाठी बोलावलं त्यावेळी शेख हे आपल्या सहकाऱ्या सह मदतीसाठी धावून गेले क्रेन बोलावून भर पासून झाड आणि फांद्या कापून काढून सफाई करण्यात आली.
यावेळी रहदारीला होणारी अडचण देखील त्यांनी तात्काळ दूर केली.