राज्यातील पदवी पूर्व (पीयूसी) द्वितीय वर्षाच्या 2021 -22 मधील पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून येत्या दि. 12 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.
कर्नाटक पदवी पूर्व शिक्षण खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार येत्या 12 ते 25 ऑगस्ट दरम्यान पीयूसी द्वितीय वर्षाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पीयूसी पुरवणी परीक्षेचे यंदाचे हे दुसरे वेळापत्रक असून ते पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार 12 -8 -2022 : कन्नड, अरेबिक शनिवार 13 -8 -2022 : भूगोल, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र. मंगळवार 16 -8 -2022 : हिंदी. बुधवार 17 -8 -2022 : पर्यायी (ऑप्शनल) कन्नड, रसायनशास्त्र, मूलभूत (बेसिक) गणित. गुरुवार 18 -8 -2022 : अकाउंटिंग, भूगर्भशास्त्र, शिक्षण, गृहविज्ञान. शुक्रवार 19 -8 -2022 : राज्य विज्ञान, गणित. शनिवार 20 -8 -2022 : तर्कशास्त्र, कर्नाटकी संगीत, हिंदुस्तानी संगीत, बिझनेस स्टडीज. सोमवार 22 -8 -2022 : इंग्रजी. मंगळवार 23 -8 -2022 : इतिहास, अंकशास्त्र. गुरुवार 25 -8 -2022 : समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स.
दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज वेबसाईटवर
दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल काल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून आज गुरुवारी दुपारी 12 वाजता शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. यंदाचा दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल 39.59 टक्के इतका लागला आहे.
राज्यात दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या 27 जून ते 4 जुलै या कालावधीत पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. त्याकरिता 94,669 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 37,479 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली आहे. आता आज गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून https://karresults.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. परीक्षेच्या नोंदणी वेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर देखील निकाल एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे.