पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे इन्फ्लो कमी असला तरी बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय आज मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राकसकोप जलाशय आज मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जलाशयाचा एक दरवाजा उघडला जाऊ शकतो. तथापि जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय दरवाजे पुन्हा उघडले जाणार नाहीत, असे पाणीपुरवठा मंडळाने स्पष्ट केले आहे. राकसकोप जलाशयाची कमाल पातळी 2475 फूट असून काल सोमवारी ही पातळी 2474.80 फूट इतकी होती. सदर जलाशय जवळपास 97 टक्के भरल्यामुळे पाणीपुरवठा मंडळ पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहे.
राकसकोप जलाशयातून रोज शहरासाठी पाण्याचा उपसा होत असल्याने इनफ्लो व उपसा यांचा ताळमेळ घातला जात आहे गतवर्षी जुलै च्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले होते त्यामुळे जलाशयाचे सर्व दरवाजे उडावे लागले होते
यावर्षी दमदार पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी झालेली नाही शिवाय यंदा महापूराची स्थिती ही उद्भवली नसल्यामुळे पावसाचे प्रमाण पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.