Saturday, January 25, 2025

/

आपत्कालीन पूर स्थितीत श्री राम सेना हिंदुस्थानची हेल्पलाईन

 belgaum

24 तास मदतीचा हात देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान तर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीत अडकलेल्यांना मदत करण्यासाठी श्री राम सेनेने हेल्पलाईन जाहिर केली आहे.

पावसाळ्याच्या परिस्थितीत आणि पूरस्थितीत अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात द्यावा ,म्हणूनच ”तुम्ही अडचणीत आहे तर आम्ही तुमच्या सोबत आहोत” या सामाजिक हेतूने श्रीराम सेनेने 24 तास मदतीचा हात देण्याची घोषणा केली आहे.

पावसाची संततधार सुरूच असून नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत परिणामी अशा संततधार पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून या परिस्थितीत मदतीचा हात द्यावा या उद्देशाने श्रीराम सेना हिंदुस्थान तर्फे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्रीराम सेनेचे स्वयंसेवक रात्र दिवस अलर्ट राहणार आहेत.Ram sena

 belgaum

श्री राम सेना हिंदुस्थान तर्फे पूरग्रस्त व अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आली असून मदतीसाठी स्वयंसेवकांच्या संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. यासाठी मदतीला उपलब्ध असणारे श्रीराम सेनेचे कार्यकर्ते त्यांची नावे आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील नमूद करण्यात आला असून अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांनी कार्यकर्त्यांना मदतीसाठी आवाहन करावे असे कळविण्यात आले आहे.

अडचणीत आहे यांना करा फोन
नवीन हचींमनी 8197669099
महेश जाधव 9964224566
श्रीकांत कुऱ्याळकर 8618691198
बाबू नावगेकर 8050414866
राजेंद्र बैलूर 9036505490
भरत नागरोळी 9972075921
बळवंत शिंदोळकर 8742421343
नारू निलजकर 8050432768
सुहास चौगुले 9036364123
रोहित जांभळे 8951069698
सचिन चव्हाण 9606885088

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.