दरवर्षी पावसामुळे सखल भागात पाणी साचणे आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या ही डोकेदुखी बेळगावकरांसाठी कायमचीच आहे.
वडगाव आनंद नगर या भागात देखील अशाच पद्धतीने पाणी साठल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र श्रीराम सेना हिंदुस्तान च्या 24 तास हेल्पलाइन च्या माध्यमातून सदर पाण्याचा जेसीबीच्या साह्याने निचरा करून देत आनंदनगरवासीयांना आनंद मिळवून दिला आहे. यावेळी बळळारी नाल्याची पाहणी देखील करण्यात आली.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडस्कर यांनी शुक्रवारी सकाळी वडगाव आनंद नगर ह्या पाणी साचलेल्या सखल भागाला अनेक ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. आणि जेसीबी सह पाण्याचा निचरा करून देत पाण्याला वाट मोकळी करून देण्यात आली यामुळे जणू घराच्या अवतीभवती निर्माण झालेला तलाव आणि यामुळे आनंद नगरवासीयांना यांना घरातून बाहेर पडताना करावी लागणारी कसरत या समस्येला श्रीराम सेनेने 24 तास मदतीच्या माध्यमातून मदत दिली आहे.
यामुळे गुरुवारी श्रीराम सेनेने घोषित केलेल्या 24 तास आपत्कालीन योजनेला प्रामुख्याने शुक्रवारी सकाळपासूनच सुरुवात झाली त् असल्याचे पाहायला मिळाले ठीकठिकाणी घरे पडणे शिवाय ठीक ठिकाणी पाणी साचणे आणि त्यामुळे होणारे नागरिकांची गैरसोय अशा विविध समस्यांसाठी संघटनेचे कार्यकर्ते कार्यरत झाल्याचे दिसून आले.
परिस्थितीचे गांभीर्य आणि नागरिकांवर आलेली वेळ या सर्वांचा ताळेबंद साधत अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर स्वतः तसेच कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून आले.