गेल्या आठवडा भरापासून तिलारी आणि राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पडत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे.
ओव्हर फ्लो व्हायच्या आतच खबरदारी म्हणून चार दिवसांपूर्वी दोन गेट उघडण्यात आले होते आता रविवारी सकाळी जलाशयाचे दरवाजे 4 दरवाजे एकेक फुटांनी उघडण्यात आले आहेत.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील राकसकोप्प जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले असून या जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
पाणीपुरवठा खात्याच्या वतीने रविवार सकाळी राकसकोप्प जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून या अगोदरच डॅम ओव्हरफ्लो होईन म्हणून दोन दरवाजे उघडण्यात आले होते रविवारी सकाळी एकूण चार दरवाजे उघडण्यात आले या चार गेट मधून जोरदार पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
जलाशयाची पातळी अर्धा टी एम सी आहे 2475 रेडिस लेव्हल क्षमता आहे त्यापैकी सध्या 2473 फूट पाणी क्षमता आहे त्यामुळे केवळ दोन फूट शिल्लक आहे.1964 साली सर एम विश्वेश्वरय्या हे पुण्यमधील एका कंपनीत अभियंता असतेवेळी या डॅमचे प्लॅन बनवले होते .जलाशय तुडुंब झाल्याने 4 गेट उघडण्यात आले आहेत.ओव्हर फ्लो झाल्यावर एकदम दरवाजे उघल्यास पूर होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अगोदर हे दरवाजे उघडण्यात आले आहेत.