Friday, January 31, 2025

/

यावर्षीही तेच…बेळळारी नाला परिसर शेतजमीन पाण्याखाली

 belgaum

पावसामुळे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सुखावला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्याला यामुळे समाधान मिळाले आहे या उलट बळळारी नाला आणि परिसरातील शेतकरी चिंतेत आहे. पावसामुळे नाल्याचे पाणी वाढत असून ,हा नाला आणि शेत जमिनीला पुराचा वेढा या धोक्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

२०१३ पासून निर्माण झालेली ही समस्या दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली असून या समस्येकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
दरवर्षी नाल्याला पुर येत असून आलेल्या पुरामुळे येथील हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली जात आहे. परिणामी पिके कुजणे शिवाय पीक खराब होऊन जाणे यामुळे पुन्हा पिकांची पेरणी अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.शेतजमीन पाण्याखाली जाऊन होत असून हातातोंडाशी आलेले पीक गमवावे लागत आहे.

बळळारी नाला परिसरात प्रामुख्याने वडगाव,शहापूर,जुने बेळगाव , अनगोळ, येळळूर, धामणे, हलगा या भागातील शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन आहे.यामुळे दरवर्षी येणाऱ्या पुराच्या वेढ्याने सदर शेतजमीन पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

 belgaum
Bellari nala
येळ्ळूर बळळारी नाल्याच्या पासण्याखाली गेलेली शेती

यापूर्वी बळळारी नाल्याची रुंदी वाढविण्यात आली मात्र खोली न वाढवल्याने पाण्याचा निचरा होतं नसून नाल्याच्या परिसरातील शेतजमीन व ओलिताखाली जात आहे.

पावसाचा जोर वाढला की नाल्याच्या पुराचा धोका वाढत असून पाणी शेत जमिनीत जात आहे . बळळारी नाल्याच्या समस्येबरोबरच हलगा मच्छे बायपास मुळे देखील शेतजमिनी ला धोका निर्माण झाला आहे.परिणामी शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Marve rajuशेतकऱ्यांच्याअडचणींची दखल घेण्याची गरज प्रामुख्याने वरच पिकांची वाढ आणि पिके आणि त्यातून मिळणारे उत्पादन मिळते अवलंबून असते मात्र शेतजमीन पाण्याखाली गेल्याने उत्पादन घटण्याबरोबरच दोन वेळा पेरणी करणे शिवाय कुजलेले पीक काढून पुन्हा नवीन लावणे या कामामुळे शेतकरी व्याकुळ झाला आहे.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक अशी परिस्थिती या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. कर्नाटक सरकारने लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी जगवला पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते राजू मरवे यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.